२०१९... प्रियंका गांधींना गंगेचा आधार, म्हणाल्या-गंगा यूपीचा आधार, मी तिच्या आधारे तेथे येणार

प्रियंका गांधी रविवारी सकाळी विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्या, प्रवासात त्यांनी प्रवाशांसोबत सेल्फीही घेतली. प्रियंका गांधी रविवारी सकाळी विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्या, प्रवासात त्यांनी प्रवाशांसोबत सेल्फीही घेतली.
Mar 18,2019 11:33:00 AM IST

लखनऊ/वाराणसी | राजकारणाची राजधानी उत्तर प्रदेशात ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा माता गंगा नेत्यांच्या ओठावर आहे.निवडणूक जवळ येताच नेतेही गंगा नदीच्या आश्रयाला येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी रविवारी ४ दिवसांच्या प्रचारासाठी लखनऊला पोहोचल्या. पहिल्या दिवशी त्या लखनऊत कार्यकर्त्यांना भेटल्या. सोमवारी प्रयागराजला जातील, तेथून त्या गंगेतून स्टीमरद्वारे वाराणसीला जातील. प्रियंका प्रयागराज, गाझीपूर, मिर्झापूर, वाराणसीत गंगेच्या मार्गाने सुमारे १४० किमीचा गंगेचा प्रवास करतील. त्यांना २ लाउडस्पीकर, १० वाहनांच्या ताफ्यासह प्रचाराची परवानगी मिळाली.


दौऱ्याआधी पत्रही लिहिले...
'यूपीच्या लोकांशी माझे जुने नाते आहे. राजकीय गणितांच्या कोलाहलात राज्यातील लोकांच्या समस्या मागे पडल्या आहेत. तुमच्यासोबत यूपीचे राजकारण बदलण्याची माझी जबाबदारी आहे. मी या धरतीशी आत्मिक रूपाने जोडलेली आहे, त्यामुळे थेट खरा संवाद साधण्यासाठी तुमच्या दारात येत आहे. मी जलमार्ग, बस, रेल्वे आणि पदयात्रा करून तुम्हाला भेटेन. गंगा सत्य आणि समानतेचे प्रतीक आहे, गंगा-यमुना संस्कृतीचे चिन्ह आहे. ती कोणाशीही भेदभाव करत नाही. गंगाजी यूपीचा आधार आहे. मी गंगाजींचा आधार घेऊन तुमच्यापर्यंत येईन.'

प्रियंका गृहमंत्री, पंडित नेहरू आणि मोदींच्या मतदारसंघातही जाणार
प्रियंकांनी यूपीत आपली निवडणूक मोहीम गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनऊ मतदारसंघातून केली आहे. तेथेच त्यांनी पहिला रोड शोही केला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही हाच मतदारसंघ होता. ते तेथून ५ वेळा निवडून आले होते. प्रियंका दुसऱ्या दिवशी प्रयागराजला जातील. या जिल्ह्यातील फूलपूर मतदारसंघातून पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सलग ३ वेळा विजयी झाले होते. त्यानंतर दोनदा त्यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित जिंकल्या होत्या. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी प्रियंका मोदींच्या वाराणसी मतदारसंघात जातील. तेथे गेल्या २८ वर्षांत आणि ७ लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकदाच पराभव झाला.

नदीचे राजकारण यासाठी...
मल्लाहांशी संवाद; राज्यात या समुदायाचे १३% मतदार, २० जागांवर प्रभाव

वाराणसीत गंगेच्या तीरावर रामनगरमध्ये प्रियंका गांधींचा पहिला संवाद मल्लाहांशी होईल. राज्यात मल्लाह समुदायाची लोकसंख्या सुमारे १३% आहे. या समुदायात निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, धुरिया, रैकवार, धीमार, मांझी, सैनी, बॉथम या उपजाती येतात. त्यांचा प्रभाव राज्यातील ८० पैकी २० लोकसभा जागांवर आहे. या जागांमध्ये फिरोजाबाद, बदायूं, शाहजहांपूर, कैराना, मछलीशहर, जौनपूर, गाझीपूर, फूलपूर, गोरखपूर, सीतापूर, बलिया, देवरिया, उन्नाव, फतेहपूर, जालौन यांचा समावेश आहे. या जागांवर या जाती जय-पराजयात निर्णायक भूमिका बजावतात.

देशात दुसऱ्यांदा बोटीने मोहीम
प्रियंका अशा दुसऱ्या नेत्या ठरतील, ज्या जलमार्गाने प्रचार करतील. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी पीएम मोदींनी अहमदाबादेत साबरमती नदीत सी-बोटीद्वारे निवडणूक शो केला होता. प्रियंकांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १४ जून १९८६ ला वाराणसी येथूनच गंगा कृती आराखडा सुरू केला होता.

X
प्रियंका गांधी रविवारी सकाळी विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्या, प्रवासात त्यांनी प्रवाशांसोबत सेल्फीही घेतली.प्रियंका गांधी रविवारी सकाळी विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्या, प्रवासात त्यांनी प्रवाशांसोबत सेल्फीही घेतली.