आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Gets Trolled By Grammy Outfit, While Mother Madhu Chopra Says, 'She Has A Beautiful Body, She Will Do Whatever She Wants To Do'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रॅमी आऊटफिटमुळे ट्रोल झाली प्रियांका तर आई मधू चोप्रा म्हणाली, 'तिचे शरीर आहे, तिला जे करायचे ते ती करेल'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा 62 व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आपल्या रेड कार्पेट अपिअरन्समुळे ती काही दिवसांपूर्वी ट्रोल झाली होती. तिने राल्फ अँड लॉरेनचा डिझाईन केलेला गाऊन घातला होता, जो खूपच बोल्ड होता आणि यामुळेच तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशातच तिची आई मां मधु चोप्रा मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा मीडियाने प्रियांकाच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारला. ज्याचे त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिले. 

आई म्हणाली - प्रियांकाचे शरीर आहे तिला जे हवे असेल ती करेल.... 

मधु चोप्रा ट्रोलिंगवर म्हणाल्या, मी खुश आहे की, हे झाले, यामुळे प्रियांका आणखी जास्त कणखर झाली. ती आपल्या अटींवर आयुष्य जगते. ती कुणाचेही नुकसान करत नाहीये. तर तिचे शरीर आहे, तिला जे करायचे असेल ते ती करेल आणि तिच्याकडे सुंदर शरीरदेखील आहे. जर ट्रोलर्सचा प्रश्न आहे तर ते  कम्प्यूटरच्या मागे लपलेले आहे, त्यांच्या आयुष्यात कोणताही आनंद नाहीये. तर हे सर्व बोलल्यामुळे त्यांना अटेंशन मिळते आणि अशा लोकांना अटेंशन देणे मी गरजेचे समाजात नाही. जेव्हा प्रियांका तो ड्रेस घालणार होती तेव्हा तिने मला फोटो पाठवला होता आणि मला ड्रेस थोडा रिस्की वाटलं होता पण तिने हा ड्रेस अगदी उत्तमपणे कॅरी केला. मी यामुळे खुश आहे की, अवॉर्ड्समधील बेस्ट ड्रेसपैकी एक होता. 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on