Home | Gossip | Priyanka-Nick arrives at the event with a hand in hand, kisses on stage, video gets viral

बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड : हातात हात घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचले प्रियांका-निक, स्टेजवर केले Kiss, व्हिडीओ झाला व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 03, 2019, 11:20 AM IST

घरातील महिलांच्या बॉन्डिंगमुळे खूप खुश आहे निक... 

 • Priyanka-Nick arrives at the event with a hand in hand, kisses on stage, video gets viral

  हॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत लॉस वेगास (नेवादा, यूनाटेड स्टेट) च्या ग्रँड गार्डन एरेनामध्ये झालेल्या बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्डमध्ये पोहोचली. बुधवारी रात्री (अमेरिकी टाइम के मुताबिक) कपलने एकमेकांचा हात हातात घेतलेला होता. या प्रसंगासाठी प्रियंकाने डिजायनर जुहैर मुरादचा गाउन घातला होता तर निकदेखील तेथे अगदी तयार होऊन आला होता. अवॉर्ड्स नाइटमढीलप दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना Kiss करताना दिसत आहे. हे तेव्हा झाले, जेव्हा निक स्टेजवर परफॉर्म करत होता आणि प्रियांका त्याच्या गाण्यावर नाचत होती.

  burning love 😍😍 🔥🔥 #BBMAs #NickJonas #PriyankaChopra pic.twitter.com/nKDzrlDrue

  — Kalimahtoyibah (@Kalimahtoyibah3) May 2, 2019

  10 वर्षांनंतर केले जोनस ब्रदर्सने परफॉर्म...
  अवॉर्ड्स नाइटचे हायलाइट जोनस ब्रदर्सचा परफॉर्मन्स होता, जो त्यांनी सुमारे 10 वर्षानंतर दिला होता. त्यांनी आपले शेवटचे सॉन्ग 'Sucker' सह अनेक हिट नंबर्स परफॉर्म केले. प्रियांका चोप्राव्यतिरिक्त दोन जेठ आणि जाऊ (निकचा मोठा केविन जोनस आणि त्याची पत्नी डॅनियल, जो जोनस आणि त्याची होणारी पत्नी सोफी टर्नर) देखील स्टेजवर परफॉर्म करताना दिसले. यादरम्यान जोनस ब्रदर्सने आपला नवीन अल्बम 'Happiness Begins' ची अनाउंसमेंटही केली, जो 7 जूनला रिलीज होणार आहे.

  घरातील महिलांच्या बॉन्डिंगमुळे खूप खुश आहे निक...
  निकने अशातच एका इंटरव्यूमध्ये घरातील महिलांच्या बॉन्डिंगवर बोलला. तो म्हणाला होता की, भाऊ आणि त्यांच्या पार्टनर्ससोबत प्रियांका बॉन्डिंग पाहून खूप छान वाटते. निक म्हणाला, "मला म्हणायचे आहे की, हे एका प्रकारचे स्वप्नच आहे, आम्ही सगळे भाऊ जेवढे एकमेकांच्या जवळ आहोत. तेवढ्याच जवळ आमच्या पत्नी आहेत. या अविश्वसनीय महिलांनी बँड पुन्हा बनवला आहे आणि ही आम्हा सर्वांची खूप मोठी सपोर्ट सिस्टम आहे. मग वैयक्तिक असो किंवा ग्रुप म्हणून असो."

 • Priyanka-Nick arrives at the event with a hand in hand, kisses on stage, video gets viral
 • Priyanka-Nick arrives at the event with a hand in hand, kisses on stage, video gets viral
 • Priyanka-Nick arrives at the event with a hand in hand, kisses on stage, video gets viral

Trending