आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपुरच्या मेकअप आर्टीस्टने केला प्रियांका-निकच्या पाहूण्यांचा मेकअप, जोधपुरच्या महिलांनी प्रियांकाच्या हातावर काढली मेंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर | प्रियांका-निकच्या लग्नात मेकअप करण्यासाठी 15 ब्यूटी एक्सपर्टची टीम बोलावण्यात आली होती. प्रियांकाचा मेकअप सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मिकी कंट्रेक्टरने केले. पाहूण्यांचा मेकअप करण्यासाठी जोधपुरच्या मेकअप आर्टिस्ट दीप्ती गोयलला बोलावण्यात आले. 

 

प्रियांकाच्या पाहूण्यांचा मेकअप केला 
दीप्ती आपल्या पाच असिस्टंटसोबत येथे आल्या होत्या. त्यांनी प्रियांकाची बिझनेस पार्टनर आणि वेडिंग ऑर्गेनायजर अपर्णा मंगनानी आणि प्रियांकाची प्रवक्ता नताशा पॉलचा मेकअप केला. अपर्णाने ग्लॉसी मेकअप कॅरी केला तर नताशा स्मॉकी आईजसोबत न्यूड लूकमध्ये दिसली होती. 

 

रविवारी मेंदी आर्टिस्ट टीम बोलावण्यात आली 
प्रियांका चोप्राच्या मेंदी सेरेमनीसाठी जोधपुरची मेंदी आर्टिस्ट ममता तातेडच्या टीमला बोलावण्यात आले होते. ख्रिश्चन वेडिंग सेरेमनी आणि दूस-या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक पाहूणे शुक्रवार-शनिवारी मेंदी काढू शकले नव्हते. यामुळे ममता आणि त्यांच्या टीमला रविवारी दुपारी बोलावण्यात आले होते. ममता आपल्या 5 सदत्यांच्या टीमसोबत रविवारी मेंदी काढण्यासाठी पोचल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...