आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Nick Leaves Jodhpur For Her Wedding Ceremony: PeeCee Mother Madhu And Sister Pariniti To In Law Family First Guest To Attend Mehendi And Sangeet Celenamay

लग्नासाठी जोधपूरमध्ये पोहोचले निकयांका, एअरपोर्टवर भावी पतीचा हात हातात धरुन दिसली प्रियांका, पीसीच्या आईबहिणीसोबत निकचे दादा-वहिनीही पोहोचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन गायक निक जोनाससोबत येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. गुरुवारी निकयांकाची मेंदी आणि संगीत सेरेमनी असून यासाठी हे दोघे त्यांच्या कुटुंबीयांसोबत जोधपूरमध्ये पोहोचले आहेत. जोधपूर एअरपोर्टवर प्रियांका तिच्या भावी पतीच्या हातात हात घालून दिसली. यावेळी ती इंडियन आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसली. प्रियांका यावेळी व्हाइट कलरच्या फ्रॉक सूट, प्लाजो आणि मल्टी कलरच्या ओढणीत दिसली. तर निकने वेस्टर्न आउटफिट कॅरी केला होता. मधू चोप्रा ब्लू आणि ग्रीन साडीत तर प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा व्हाइट जंपसूट आणि ब्लू अपरमध्ये दिसली. निकचे दादा-विहिनी अर्थातच जो जोनास आणि सोफी टर्नरही जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. 


संगीत सेरेमनीत आईसोबत परफॉर्म करणार प्रियांका... 
- प्रियांका संगीत सेरेमनीत आईसोबत परफॉर्म करणार आहे. दोघीही एका स्पेशल गाण्यावर डान्स करणार आहेत. पीसी आणि निकदेखील एकत्र परफॉर्म करणार आहेत. संगीत सेरेमनी कोरिओग्राफर गणेश हेगडे कोरिओग्राफ करत आहेत.

-  यावेळी निक बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणार आहे. प्रियांकाच्या चित्रपटातील गाणे 'गल्ला गुडियां..', 'देसी गर्ल..' 'पिंगा..' या गाण्यावर निक थिरकणार असल्याचे समजते. याशिवाय निक त्याच्या भावी पत्नीसाठी हिंदी गाणी गाणार आहे. तो त्याच्या टीमसोबत 45 मिनिटांचे गाण्यांचे सादरीकरण करणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी निकयांकाने त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले आहे.

 

5 दिवस चालणार प्रियांका-निकचे वेडिंग फंक्शन 

- निकयांका दोन पद्धतीने लग्न थाटणार आहेत. 2 डिसेंबर रोजी हिंदू आणि 3 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघे लग्न करणार आहेत.1 डिसेंबर रोजी निक आणि प्रियांका यांना हळद लागणार आहे. 
- हिंदू पद्धतीने होणा-या लग्नात प्रियांका डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान करणार आहे. तर ख्रिश्चन पद्धतीने होणा-या लग्नात ती Ralph Lauren च्या आउटफिटमध्ये दिसेल.

 

80 गेस्ट होणार सहभागी
- निकयांकाच्या लग्नात फ्रेंड्स आणि फॅमिली मिळून एकुण 80 पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नात प्रियांकाने बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केलेले नाही. 
- लग्नानंतर निकयांका 2 रिसेप्शन देणार आहेत. एक रिसेप्शनल 4 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर मुंबईतही एक रिसेप्शन असून यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अद्याप मुंबईत होणा-या रिसेप्शनची तारीख जाहिर करण्यात आलेली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...