आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीमध्ये सोनम-आनंदने प्रियांका-निकसोबत एन्जॉय केली पूल पार्टी, असा होता निकचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मुकेश अंबानीच्या मुलीच्या एंगेजमेंट सेरेमनीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सहभागी झाली. सेरेमनी संपल्यानंतर सेलेब्स इटलीमध्ये एन्जॉय करताना दिसले. सोनम कपूर-आनंद आहूजा, प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा पती निक जोनाससोबत पूल पार्टी करताना दिसले. पार्टी एन्जॉय करतानाचे चौघांचे फोटोज खुप व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये निक स्मोकिंग करताना तर कधी ड्रिंक्स पिताना दिसतोय. 


यावेळी प्रियांका निकच्या आजुबाजूला दिसतेय 
- पूल पार्टी दरम्यान चौघांमध्येही चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली. चौघांमध्ये मजामस्ती आणि खाणे-पिणे सुरु आहे. 
- प्रियांका आणि सोनम चिल मूडमध्ये दिसल्या. प्रियांकाने ब्लू टॉप आणि व्हाइट स्कर्ट घातला होता, तर सोनम स्ट्रीप ड्रेसमध्ये दिसली.
- प्रियांकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर 'द स्काइ इज पिंक' हा तिचा आगामी सिनेमा आहे. सोनाली बोसच्या या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर आहे. 


वडिलांसोबत पहिल्यांता सिनेमात दिसणार सोनम 
सोनमच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा तिचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमामध्ये सोनम पहिल्यांदाच वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच 'जोया फॅक्टर'मध्येही ती दिसणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार आनंद आहूजा फिल्म प्रोडक्शनच्या फील्डमध्ये येऊ शकतो. तो आपले सासरे अनिल कपूर आणि मेहूणी रियाकडून प्रोडक्शनच्या ट्रिक्स शिकत आहे.

बातम्या आणखी आहेत...