आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Nick Wedding Parineeti Chopra Ask 5 Million Dollars For Returning Shoes

प्रियांका-निकचे लग्न : बूट चोरण्याच्या विधीवेळी होणा-या भावोजींकडून 37 कोटी रुपये मागणार आहे परिणीती चोप्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नासंदर्भात सध्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. निकची मेहुणी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने तिच्या होणा-या भावोजींकडे बुट चोरण्याच्या विधीसाठी मोठी डिमांड ठेवली आहे. आजपर्यंत अशी डिमांड कदाचितच कधी कुणी केली असावी. परिणीतीने एका एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने बूट चोरण्याच्या विधीसाठी भावोजी निककडे 5 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 37 कोटींची डिमांड केली आहे. पण तिचे भावोजी निक परिणीतीपेक्षा जास्त हुशार निघाले. परिणीतीने सांगितले की, जीजू निकने तिला 10 डॉलर (740 रुपये) देण्याचे वचन दिले आहे. पण एवढ्या कमी पैशांत बूट परत करणार नसल्याचे परिणीतीने सांगितले. 

 

या गाण्यांवर बहिणीच्या लग्नात थिरकणार आहे परिणीती... 
- परिणीती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रियांकाच्या लग्नासाठी काय काय तयारी केली हे सांगितले. मुलाखतीत तिला प्रश्न विचारला गेला की, लग्नात ती कोणकोणत्या गाण्यांवर डान्स करणार आहे. त्यावर परिणीतीने सांगितले, 'तूने मारी एंट्री..', 'राम चाहे लीला चाहे राम..', या गाण्यांवर आणि निकच्या काही निवडक गाण्यांवर ती डान्स करणार आहे. 


रोका सेरेमनीत एक्साइटेड होती परिणीती... 
प्रियांकाची ऑगस्ट महिन्यात रोका सेरेमनी झाली. यावेळी परिणीती बरीच एक्साइडेट दिसली होती. सेरेमनीत पोहोचणारी ती पहिली सेलेब होती. रोका सेरेमनीपुर्वी ती प्रियांका आणि निकसोबत गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली होती. परिणीतीचे 'नमस्ते इंग्लंड' , 'संदीप और पिंकी फरार', 'केसरी' आणि 'जबरिया जोडी' हे आगामी चित्रपट आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...