आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Nick Wedding Through Christian Ceremony, Sky Lit Bright In Crackers, Camera And Phones Restricted In Ceremony

प्रियांका-निकचे हाय सिक्टोरिटी वेडिंग : वेन्यूवर ड्रोन कॅमेरा शूट करण्यासाठी इस्रायलमधून बोलावले 12 शूटर्स, सुरक्षेसाठी तैनात आहेत 100 रक्षक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर| अभिनेत्री प्रियांका चोप्राने शनिवारी निक जोनाससोबत क्रश्यियन पध्दतीने लग्न केले. दुपारी न्यूयॉर्कचा डिझायनर रॉल्फ लॉरेनने डिझाइन केलेल्या सुंदर व्हाइट गाउनमध्ये प्रियांका निकसोबत पोहोचली. कपलने एकमेकांना स्विटजरलँडच्या ज्वेलर चोपर्डचे डिझाइनर वेडिंग बँड्स घातले आणि एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले. लग्नाच्या पध्दती हे निकचे वडील आणि पादरी राहिलेल्या पॉल केविन जोनास यांनी पुर्ण केल्या. आज (रविवारी) हिंदू पध्दतीने दोघांचे लग्न होणार आहे. या हायप्रोफाइल लग्नाच्या फोटोजचे राइट्स जवळपास अडीच मिलियन डॉलर(जवळपास 17.5 कोटी रुपये) मध्ये एका मॅग्जीनला विकण्यात आले आहे. या मॅग्जीनचे नाव अजून समोर आलेले नाही. 

 

लग्नाचे फोटोज आणि माहिती समोर येऊ नये यासाठी उम्मेद भवन पॅलेसवर कडेकोट सुरक्षेचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उम्मेद भवनातील जास्तीत जास्त स्टाफ या लग्नापासून दूर ठेवण्यात आला आहे. तर लग्नाची व्यवस्था पाहणा-या स्टाफकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. पाहूण्यांना लग्नाची माहिती आणि फोटो शेअर न करण्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच ड्रोनने कुणी फोटो काढू नये यासाठी, इजरायलवरुन 12 शूटर्स बोलावण्यात आले आहेत. हे आकाशात ड्रोन दिसल्याबरोबर ड्रोनला शूट करु शकतील. शनिवारी दुपारी काही फोटोग्राफर्स सर्किट हाउस जवळच्या उंच इमारतींवर फोटो घेण्यासाठी पोहोचले. पण तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. यासोबतच गणेश मंदिराच्या पहाडाजवळील पाण्याच्या टँकवरही गार्ड्स तैणात करण्यात आले आहेत. 

 

4 तारखेला दिल्लीमध्ये रिसेप्शन 
- दीपिका-रणवीरच्या लग्नाचा इव्हेंट करणारी कंपनी जबाबदारी सांभाळतेय.
- प्रियांकाने कुंदनची ज्वेलरी जोधपुरमध्ये डिझाइन केली आहे. 
- 4 डिसेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्शन होणार. मुंबईच्या रिसेप्शनची तारीख अजून समोर आलेली नाही.

 

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, स्टाफकडून घेतले मोबाइल 
लग्नाचे फोटो ड्रोनच्या माध्यमातून घेता येऊ नये यासाठी खासजी कंपनीचे 12 शूटर्स बोलावण्यात आले आहे. जवळपास कुठे ड्रोन दिसल्यावर ड्रोन उडवण्याचे स्पष्ट आदेश त्यांना देण्यात आले आहे. तसे पाहिले तर उम्मेद भवनाच्या जवळपासचा परिसर ड्रोनच्या हिशोबाने अगोदरच नो फ्लाइंग झोन आहे. उम्मेद भवनामध्येही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त आहे. निक जोनासकडून अमेरिकेच्या एका सिक्योरिटी कंपनीकडून 100 गार्ड्स बोलावण्यात आले आहे. हे ठिकठिकाणी तैणात आहेत. यासोबतच हरियाणाच्या एका कंपनीलाही सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. उम्मेद भवनाच्या चारही बाजूला स्थानिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. 

 

वेंडर्सला बार कोडींग पासने प्रवेश, मोबाइल घेऊन जाण्यास नेण्यास बंदी 
इव्हेंट कंपनीकडून वेंडर्सला दिलेल्या कार्डवर बारकोड आहे. बारकोड स्कॅन करुनही वेंडर्सला आत पाठवले जात आहे. यासोबतच अनेक नियम-कायदे बनवून बँड भरवण्यात आला आहे. त्यांना प्रवेशापुर्वी आपले मोबाइल जमा करायचे आहेत. 
- रविवारी संध्याकाळी उम्मेद भवन पॅलेसमध्ये आतिषबाजी करण्यात आली. फोटो - विकास बोडा 

 

पाहूण्यांकडून लिहून घेतले - फोटो कुठेही शेअर करणार नाही 
प्रियांका-निकने देशी-विदेशी पाहूण्यांसाठी पुर्ण गाइड बुक जारी केली आहे. यामध्ये भारतीय लग्न आणि वेस्टर्न लग्न दोन्हींचीही माहिती आणि फोटो न घेण्याची अपील करण्यात आली आहे. इन्विटेशनसोबत पाचशे रुपयांचा स्टांप पेपरही साइन करुन घेतला आहे. यामध्ये लग्नाचे फोटो न घेण्याचे आणि लग्नासंबंधीत माहिती न देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

 

कर्मचा-यांकडून स्मार्ट फोन घेऊन त्यांना की-पॅड फोन देण्यात आले
लग्नाची जबाबदारी बघत असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने उम्मेद भवन पॅलेसच्या जास्तीत जास्त स्टाफला कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवले आहे. तर व्यवस्थेमध्ये असणा-या कर्मचा-यांकडून स्मार्टफोन घेऊन त्यांना की-पॅडचे फोन देण्यात आले आहे. यामुळे कुणीही फोटो व्हायरल करु शकणार नाही. काही सिक्योरिटी गार्ड्स स्टाफवरही नजर ठेवत आहेत. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...