आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिपी ध्वनिलहरींची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खमंग, चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या अनेक पाककृती आपण सर्वांनी आजवर ऐकल्या-पाहिल्या आणि चाखल्या आहेत. मात्र इथं प्रयोगशाळेत तयार होतेय एक अनोखी पाककृती. जी चाखायची नाहीये तर चक्क अनुभवायची आहे. ही पाककृती आहे ध्वनिलहरींची.

 

आज काही अभ्यास वगैरे बिलकुल नाही हां. आज जरा रेसिपी वगैरे बघूयात. चालेल ना?
होय मॅडम, जोरात आवाज घुमला.
तर आज आपण बनवणारै सायन्समधले बटर पनीर आणि बटर चिकन. म्हणजे longitudinal waves आणि transverse waves.
त्यासाठी साहित्य लागणार आहे, एक मिडियम म्हणजे माध्यम आणि particles, एनर्जी.


कृती - सगळ्यात आधी घ्या एक एकसलग म्हणजे continues medium जे सुरुवातीला एकदम आरामात असेल. म्हणजे intially at rest. त्यात नऊ पार्टिकल्स एका रेषेत ठेवू. मग आता त्यातल्या पहिल्या पार्टिकलला थोडीशी एनर्जी देऊ. जरा एनर्जी मिळाली की तो लागेल मोहरीसारखा तडतडायला. म्हणजेच vibrate होईल. excited झालेला तो लगेच शेजारच्या पार्टिकलला जाईल सांगायला आणि एनर्जी त्याला देईल. दुसराही लगेच एनर्जी मिळाली की, वरखाली नाचायला लागेल. पण जास्ती नाही. पातेल्याच्या अर्ध्या भागापर्यंतच. अर्थात half of the amplitude पर्यंतच. परत तोही त्याच्या शेजारच्याला एनर्जी देऊन तडतडायला सांगेल. असं करत करत हे लोण पोहोचेल नवव्यापर्यंत. कारण सगळेच एका हाताच्या अंतरावर ठेवलेत ना म्हणजे equidistant हो. आणि एनर्जी पासिंग तसंच vibrations साठी वेळही तेवढाच घेतील. तसे शहाणे सुरते आहेत हो हे पार्टिकल्स. एका दिशेत तडतडतील.


जेव्हा दोन पार्टिकल जेव्हा एकाच दिशेत, एकाच फेजमध्ये, एकाच टाईममध्ये तडतडतात तेव्हा तयार होते wavelength म्हणजे आपली ग्रेव्हीच की.


हं आता ग्रेव्ही तयारै. मग यात जर ते पार्टिकल मिडियमच्या दिशेला perpendicular व्हायब्रेट झाले तर ते झालं transverse wave आणि parallel झाले की longitudinal waves.
यांच्या तडतडण्याने एक ग्राफ काढता येतो.


वर गेले तडतडत की, तयार होतो उंचवटा म्हणजेच crest आणि खाली आले की trough. म्हणजे दरीच.


हे वरखाली तडतडतात फक्त transverse लाच हं. Longitudinal मध्ये मात्र उगीचच पुढेमागे पळतात. पळता पळता कधी जवळ येतात. तेव्हा तयार होतो compression आणि दूर गेले की rarefaction.


आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंच हं. भांडी म्हणजे मिडियम वेगवेगळी वापरावी लागतात यांना बनवताना.


transverseला फक्त solid medium लागतं तर longitudinalला solid, liquid or gasseous पैकी कोणतंही चालेल.


जसं हातावरही भाकरी बनते ना तसं transverse मधल्या electromagnetic wavesना कोणत्याही भांड्याची म्हणजे मिडियमची गरजच नाही.


या झाल्या आपल्या दोन भाज्या तयार. बटर ग्रेव्ही तीच ठेवायची. फक्त perpendicular पनीर काढून longitudinal चिकन टाकायचं. आहे की नाही मजेशीर?


या भाज्या कशाबरोबरही शेअर करता येतात. म्हणजे ५ मार्क्सच्या प्रश्नात सेपरेट सेपरेट किंवा “फरक स्पष्ट करा’ मध्ये एकत्रित. चवीचा निकाल रिझल्टदिवशी हमखास positive येणार.

 

 

बातम्या आणखी आहेत...