आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकटपणा कसा ओळखायचा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याइतकं तेल प्रवाही नाही किंवा दूधही तितकं प्रवाही नसतं. तसंच एखादा स्थायू पदार्थ त्या द्रव्यांमध्ये टाकला असता तो वरपासून खालपर्यंत जायला घेणारा वेळही वेगवेगळा असतो. म्हणजे जर दोन समान आकाराचे जार घेतले आणि एकात खाद्यतेल व एकात पाणी भरलं, दोन्हीमध्ये एकाच वेळी समान आकाराच्या काचेच्या गोट्या टाकल्या तर जारच्या तळाशी जाण्यासाठी दोन्ही गोट्यांना लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल. 

 

V iscoSity म्हणजे त्या पदार्थाची प्रवाहितता किंवा चिकटपणा हे आपण अगदी सहजपणे सांगायचं तर सांगू शकतो. प्रत्येक द्रवाची वेगळी प्रवाहितता असते. पाण्याइतकं तेल प्रवाही नाही किंवा दूधही तितकं प्रवाही नसतं. तसंच एखादा स्थायू पदार्थ त्या द्रव्यांमध्ये टाकला असता तो वरपासून खालपर्यंत जायला घेणारा वेळही वेगवेगळा असतो. म्हणजे मी जर दोन समान आकाराचे जार घेतले आणि एकात खाद्यतेल व एकात पाणी भरलं, दोन्हीमध्ये एकाच वेळी समान आकाराच्या काचेच्या गोट्या टाकल्या तर जारच्या तळाशी जाण्यासाठी दोन्ही गोट्यांना लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल. 


आणि जर दोन्ही जारमध्ये तेल ओतलं, पण गोट्यांचा आकार बदलला तर लागणारा वेळही बदलतो.
आम्ही जेव्हा प्रयोगशाळेत viscosity by stoke’s method हे प्रात्यक्षिक घेत असतो तेव्हा लिक्विड माध्यम म्हणून ग्लिसरीन वापरतो, पण वेगवेगळ्या आकाराचे बेअरिंग बॉल्स 
वापरतो. यात विद्यार्थ्यांना मजा येते, कारण आधी त्यांना प्रत्येक बॉलची त्रिज्या म्हणजे रेडियस काढायची असते आणि नंतर ठरावीक त्रिज्येच्या बेअरिंग बॉलला A मार्किंगपासून B मार्किंगपर्यंत जाण्यासाठीचा वेळ मोजायचा असतो. नजरेचा खेळ सगळा. जरा नजर हटली की, वेळेचं गणित बदलतं आणि येणारं रीडिंगही बदलतं. जरा जरी चुकलं तरी परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. पण हा खेळ खेळायला 
मजा येते. एकाग्रता प्रचंड वाढते यात. ज्याची त्रिज्या कमी त्याला लागणारा वेळ जास्ती, तर ज्याची त्रिज्या जास्ती त्याला लागणारा वेळ कमी हे एकदा लक्षात आलं की, परत स्वतःहून हे प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थी तयार होतात.
हां, पण हे त्रिज्या वेळेच्या व्यस्तानुपाती म्हणजे inversely proportional का असते हे मात्र तुम्ही मला मेल करून सांगायचं आहे. सांगाल ना? 

बातम्या आणखी आहेत...