आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी-वढेरा भिडले: वरुण हे वैचारिक युद्ध आहे, चहा पार्टी नाही, प्रियंकाने सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- गांधी कुटुंबातील सदस्य वरुण गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाब्दिक युद्ध पेटले आहे. प्रथम प्रियंका यांनी वरुणवर टीका केली होती. त्यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया देताना वरुण यांनी म्हटले होते, की प्रियंका यांनी सभ्यतेची सीमारेषा ओलांडली आहे. त्यावर संतापलेल्या प्रियंका म्हणाल्या आहेत, की वरुण हे वैचारिक युद्ध आहे. ही काही घरची चहा पार्टी नाही.
वरुण गांधी यांनी आज सुलतानपूर येथून उमेदवारी अर्ज सादर केला. याच दिवशी त्यांच्यावर प्रहार करताना प्रियंका म्हणाल्या, की माझ्या मुलाने जर असे काही केले असते तर मी त्याला कधीही क्षमा केले नसते. ही काही घरची चहा पार्टी नाही. हे वैचारिक युद्ध आहे.
यापूर्वी प्रियंका यांनी म्हटले होते, की शेजारच्या सुलतानपूर मतदारसंघात भाजपला मते देऊ नका. तेथून माझा चुलत भाऊ वरूण निवडणूक लढवित आहे. तो माझ्या कुटुंबातील असला तरी भरकटलेला आहे. तो चुकीच्या मार्गाने जात आहे. जर तरुण मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर घरातील मोठ्यांनी त्याला योग्य मार्ग दाखविला पाहिजे.
त्यावर कडक प्रतिक्रिया देताना वरुण म्हणाले होते, की मी माझ्या मार्गापेक्षा देशाच्या विकासाचा विचार केला आहे. माझ्या परिने जसे होईल तसे मी देशासाठी काम करीत आलो आहे. मी माझ्या भाषणांमध्ये कधी मर्यादा पार केली नाही. परंतु, प्रियंकाने सभ्यतेची सीमारेषा ओलांडली आहे.