Home | National | Other State | Priyanka's Dialogue with Activists-Leaders

कार्यकर्ते-नेत्यांशी संवाद; पक्षीय जबाबदारीवर माझे पूर्ण लक्ष : प्रियंका गांधी

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 10:43 AM IST

प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • Priyanka's Dialogue with Activists-Leaders

    लखनऊ- अंमलबजावणी संचालनालयासमोर पती रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरू आहे. ही प्रक्रिया चालत राहील. त्यामुळे विचलित होणार नाही. आता मी पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित केले आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले.

    प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप असलेले वढेरा यांची सध्या चौकशी सुरू आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही भूमिका मांडली. मंगळवारी वढेरा यांना जयपूर येथील कार्यालयात नेण्यात आले होते. तेव्हा प्रियंका त्यांच्यासमवेत होत्या. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी वढेरा यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या आई मौरिन वढेरा यांचीही चौकशी झाली. ईडीने राजस्थानच्या बिकानेर शहरातील एका जमीन सौद्यासंबंधी वढेरांची चौकशी केली. सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी झाली. पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मला आनंद वाटला. मी संघटनात्मक पातळीवरील गोष्टी समजून घेत आहे. संघटनात्मक बांधणी नेमकी कशी आहे, निवडणुकीत कशा प्रकारे संघर्ष करावा लागतो, या गोष्टी मला शिकायच्या आहेत. त्या दिशेने माझे प्रयत्न सुरू आहेत. विविध मतदारसंघांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. अमेठीसह अनेक मतदारसंघांतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.

Trending