आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka's Emotional Post About The Death Of Kobi Brian And His Daughter, Akshay Said I'm Not In A Position To Say Anything

कोबी ब्रायन आणि त्याच्या मुलीच्या निधनाबद्दल प्रियांकाने लिहिली भावनिक पोस्ट, अक्षय म्हणाला - मी काहीही बोलण्याच्या अवस्थेत नाहीये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमेरिकन बास्केटबॉल लीग ‘एनबीए’ चे दिग्गज खेळाडू कोबी ब्रायन आणि त्याची मुलगी गियाना यांच्या निधनावर प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केले आहे. प्रियांकाने इंस्टाग्रामवर ब्रायन आणि गियानाचा फोटो शेअर करून भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिच्यानुसार, कोबी ब्रायनमुळे जेव्हा पहिल्यांदा तिला एनबीए बद्दल कळले होते. त्यावेळी ती त्याची मुलगी गियानाच्याच वयाची असेल.  

या अपघातामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे : प्रियांका....   

प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "कोबी ब्रायन ती पहिली व्यक्ती होता, ज्याच्यामुळे मला एनबीए म्हणजे काय हे कळाले. तेव्हा मी 13 वर्षांची होते आणि क्वीन्स न्यूयॉर्कमध्ये राहात होते. अगदी त्याची स्वीट लिटिल एंजल गियानाच्या वयाची. त्याने माझ्यामध्ये स्पोर्ट, कम्पटीशन आणि उकृष्ठतेसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेम जगवले. त्याने संपूर्ण पिढीला प्रेरित केले. त्याचा वारसा बास्केटबॉलपेक्षा खूप मोठा आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेने त्याच्या निष्पाप मुलींचेही आयुष्यदेखील हिरावून घेतले. यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झाले आहे. मी खूप दुःखी आहे."

कोबीने माझ्या भाचीला प्रेरित केले : अक्षय...  

कोबी ब्रायनच्या निधनाची बातमी ऐकल्यावर अक्षय कुमारने लिहिले, "दिग्गज एथलीट बास्केटबॉलचे बॅकमाम्बा आणि त्याची मुलगी गियानाच्या निधनावर मी काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. तू अनेक मुलांना बास्केटबॉल खेळण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यामध्ये माझी देखील सामील आहे. जी लहानपणापासूनच प्रत्येक दिवशी बास्केटबॉल खेळते."

फरहान अख्तरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "कशी दुःखद घटना आहे. कोबी ब्रायन आणि गियाना ब्रायनच्या आत्म्याला शांती मिळो. त्याच्या कुटुंबीयायांना माझ्या संवेदना. प्रार्थना करतो की, अल्लाह त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."

रणवीर सिंहने इंस्टाग्रामवर कोबी ब्रायनचा एक फोटो शेरा केला आहे. याच्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुझ्या आत्म्याला शांती मिळो कोबी."