आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने मेरीकॉमला दिल्या विजयाच्या शुभेच्छा, म्हणाली - तु माझी प्रेरणा आहेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिनं 48 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला. मेरी कोमचं जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतलं हे सहावं सुवर्णपदक आहे. ती आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली आहे. तिच्या या विजयानंतर तिच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका साकारणा-या प्रियांका चोप्राने तिला शुभेच्छा दिल्या आहे. मेरी कोमचा बायोपिक 2014 मध्ये आला होता. याचे डायरेक्शन ओमंग कुमार यांनी केले होते. 

 

हॉलिवूडमध्ये बोलावले होते मेकअप आर्टिस्ट 
चित्रपटात प्रियांकाला मेरी कोमचा लूक देण्यासाठी हॉलिवूडचे मेकअप आर्टिस्ट मार्क गर्बरीन यांना बोलावण्यात आले होते. प्रोस्थेटिक आणि हेवी आयलिड्स लावल्यानंतर प्रियांका विचित्र दिसत होते, यामुळे ही आयडिया ड्रॉप करण्यात आली होती. यानंतर प्रियांकाचा मेकअप उदय शिराली आणि सुभाष शिंदे यांनी केला होता. 

 

मुळ राज्यात रिलीज झाला नव्हता चित्रपट 
मणिपुर, मेरी कोमचे गाव आहे. येथे हा चित्रपट रिलीज करण्यात आला नव्हता. येथे हिंदी चित्रपट रिलीज करण्यावर अलगाववादियांनी बॅन केला होता. हा चित्रपट मेरी कोमची ऑटोबायोग्राफी अनब्रेकेबल यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात बॉक्सिंग सीनच्या शूटिंग दरम्यान प्रियांकाच्या अंगठ्याला इजा झाली होती. 

 

प्रियांकाने अशी केली होती तयारी 
भारतीय महिला बॉक्सिंग टीमच्या कोच हेमलता सिंह बगडवाल यांनी प्रियांकाला बॉक्सिंगची ट्रेनिंग दिली होती. हेमलताने सांगितले होते - मी माझ्या व्यस्त शेड्यूलच्या काळात प्रियांकाला जवळपास 200 दिवसांपेक्षा जास्त ट्रेनिंग दिली असेल. ही ट्रेनिंग सतत नव्हती. अनेक भागांमध्ये आम्ही एकमेकींसोबत काळ घालवला. कधी गोवा तर कधी मुंबईत ट्रेनिंग दिली. अनेकदा मी व्यस्त असायचे तर कधी प्रियांका व्यस्त असायची. तरीही आम्ही शेड्यूल फिक्स करुन एकमेकींना वेळ दिला. 

 

तीन महिन्यात बनवले होते फिजीक 
प्रियांकाला मेरी कोम प्रमाणे मस्कुलर फिजी बनवण्यासाठी आणि तिच्याप्रमाणे बॉक्सिंग स्टाइल शिकवण्यासाठी तीन महिन्यांचा काळ लागला होता. हेमलतासोबत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील नॅशनल खेळाडू झरना संघवीने प्रियांकाला बॉक्सिंगची ट्रेनिंग दिली. झरनाने प्रियांकाला 20 दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले होते. यानंतर संपुर्ण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती तिच्यासोबत राहिली. 
 

 

 

Wow! Only you could do it!! What an achievement... the first female boxer to win the #WorldChampionship for an unprecedented 6th time! Congratulations @MangteC... It’s a proud moment for the nation & you are and always will be my inspiration.. Here’s to #MagnificentMary 💪🏼

— PRIYANKA (@priyankachopra) November 24, 2018

बातम्या आणखी आहेत...