आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro.Vinay Tayade Akola Article About Need Of Salary Get To Farmer

शेतकऱ्यांनाही वेतन देण्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शेतकऱ्याला पगार’ हा अग्रलेख वाचला. शेतकरी समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या लेखातील अनेक मुद्दे पटणारे आहेत. आज शेतकरी अनेक संकटांचा सामना करून जीवन जगत आहे. शेतकरी मदतीचा विषय आला की विविध तर्कवितर्क लावण्यात येतात. शेतकऱ्यांना विविध नावांचे िबरूद लावण्यापलीकडे नेत्यांनी काहीही केले नाही. शेतकऱ्यांना काही द्यायचे म्हटले की सर्वसामान्यांच्या कपाळावर लगेच आठ्या येतात. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, डाळीच्या भावाने शंभरी पार केली तरी कोणी मोर्चे काढीत नाही. शाॅपिंग माॅल आणि मल्टिप्लेक्समध्ये तिकिटाचे दर सातत्याने बदलत असतात. त्याविषयीही कोणी काही बोलत नाही. विदर्भात शेतकऱ्यांची समस्या सर्वाधिक िबकट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात विदर्भाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे भाजपच्या काळात तरी शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, जवळपास एक वर्षाचा काळ लोटला तरी शेतकऱ्यांसाठी व्याजमाफीशिवाय कुठलीही मोठी घोषणा झालेली नाही. शेतकरी दुसऱ्यांचा विचार करून मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, यासाठी दिवसरात्र राबत असतो, परंतु त्याच्या मेहनतीला निसर्ग साथ देत नसल्याने तो खचला आहे. अशात ज्यांना गलेलठ्ठ पगार आहे ते शेतमालाचे भाव वाढले की ओरडताना दिसतात. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना वेतन देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल का, याचाही विचार होण्याची गरज आहे.