आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत समर्थक इब्राहीम मोहम्मद सोलिह मालदीवचे नवे President, चीनला मित्र मानणारे यामीन यांचा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मले - राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी) चे नेते इब्राहिम यांचा विजय झाला आहे. लवकरच मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे इब्राहिम मोहम्मद सोलिह भारत समर्थक मानले जातात. त्यांनी रविवारी झालेल्या निवडणुकीत आपले सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला सालेह यांना पराभूत केले. मतमोजणीत त्यांनी 58.3 मते मिळवली. विजयापूर्वी सोलिह यांनी आपल्या भाषणात म्हटले, की "हा क्षण आनंदन आणि उमेदीचा आहे." यामीनने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इब्राहिम भारताचे समर्थक मानले जातात. तर यामीन हे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष होते. 


सोलिह समर्थकांचा जल्लोष
54 वर्षीय सोलिह यांना एकूणच 2,62,000 मतांपैकी 1,33,808 मते मिळाली आहेत. तर यामीन यांना 95,526 मते पडली आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत 88 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही स्पर्धेत नव्हते. कारण, यामीन यांनी त्यापूर्वीच आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात डांबले होते. तर काहींना देश सोडावा लागला. त्यामुळेच, मूळात ही निवडणुकच बेकायदा असल्याचे त्यांच्या विरोधकांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा या निवडणुकीवर टीका करण्यात आली आहे. दरम्यान सोलिह यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांचे समर्थक पिवळे झेंडे घेऊन रस्त्यांवर जल्लोष साजरे करण्यासाठी उतरले. 


यामीन यांचा वादग्रस्त कार्यकाळ
2013 मध्ये यामीन मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांच्या कार्यकाळात राजकीय पक्ष, विरोधक, न्यायालये आणि माध्यमांवर विविध प्रकारचे अंकुश लावण्यात आले होते. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी यामीन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु, यामीन यांनी आपल्या विरोधात असलेल्या खासदारांवरच कारवाई केली. त्यापैकी काहींना देश सोडावा लागला. तर काहींना तुरुंगात डांबण्यात आले. याचवर्षी मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला राजकीय कैद्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. परंतु, यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावून लावत 15 दिवसांची आणीबाणी लागू केली.

बातम्या आणखी आहेत...