कोणत्याही जुन्या टीव्हीला / कोणत्याही जुन्या टीव्हीला 2 मिनिटात बनवा स्मार्ट टीव्ही, फक्त 1500 रूपये येईल खर्च; अशी आहे प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम

Jan 05,2019 01:59:00 PM IST
गॅजेट डेस्क : सध्या स्मार्ट टीव्हीचा काळ सुरू आहे. प्रत्येकाला वाटते की, आपल्याकडे पण स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही असावा. पण स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीच्या आभाळाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्यांना ते सहज शक्य होत नाही. आपल्याकडे जर एखादा जुना CRT टीव्ही असेल तर मग आपणही स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला HDMI टू AV कनव्हर्टर, क्रोमकास्ट किंवा एनीकास्ट आणि एक 3 पिन ऑडियो-व्हिडिओ केबलची आवश्यकता आहे. HDMI टू AV कनव्हर्टरची किंमत 600 रूपये आणि क्रोमकास्टची किंमत 800 रूपये आहे. तर केबल 100 रूपयांना मिळते. अशाप्रकारे एकूण 1500 रूपयांमध्ये तुमचा जुना टीव्ही अँड्रॉईडप्रमाणे काम करेल. या संपूर्ण प्रक्रियेला 2 मिनिटे लागतात. जुना CRT टीव्ही स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीमध्ये कसा बदलता येईन याबाबतची प्रोसेस माहीत करून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पाहा......

X
COMMENT