टाटा स्काय किंवा डिश टीव्ही....घरात कोणत्याही कंपनीचे असू द्या DTH कनेक्शन, एकाच छत्रीद्वारे 2 टीव्हीवर पाहू शकतात वेगवेगळे चॅनल्स; दुसऱ्या रिचार्जच्या पैशांची होईल बचत

दिव्य मराठी

Apr 17,2019 12:46:00 PM IST


गॅझेट डेस्क - तुमच्या घरात दोन टीव्ही आहेत पण दोघांसाठई वेगवेगळ्या डिश किंवा केबल कनेक्शन वापरत असाल तर तुम्हाला आता असे करण्याची आवश्यकता नाही. खरं तर तुम्ही एकाच डिशला घरातील दोन्ही टीव्हींना जोडू शकतात. इतकेच नाही तर दोन्ही टीव्हीवर वेगवेगळे चॅनल्स दिसतील. या ट्रिकमुळे तुम्हाला दोन कनेक्शनचे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

अशी आहे कनेक्शनची पूर्ण प्रोसेस

> एकाच DTH द्वारे दोन टीव्हीत वेगवेगळे चॅनल्स पाहण्यासाठी एक एक्स्ट्रा सेटटॉप बॉक्सची आवश्यकता आहे. कारण एका सेटटॉप बॉक्सवर फक्त एकाच टीव्हीचे चॅनल्स बदलता येतील. यामुळे दोन टीव्हीसाठी दोन सेटटॉप बॉक्सची गरज आहे.

> सेटटॉप बॉक्समध्ये LNB IN पोर्ट असतो. पण आपल्याला एका सेटटॉप बॉक्समध्ये LNB OUT पोर्ट असलेला सेटटॉप बॉक्स हवा आहे. सेटटॉप बॉक्समध्ये तो पोर्ट नसेल तर टीव्ही पाहू शकणार नाहीत.

> दोन सेटटॉप बॉक्स मधील एक MPEG-4 आणि दुसरा MPEG-2 सेटटॉप बॉक्स असणे आवश्यक आहे. MPEG-2 सेटटॉप बॉक्समध्ये LNB IN आणि LNB OUT दोन्ही पोर्ट असतात.

> DTHची मेन केबल या सेटटॉप बॉक्सच्या इन पोर्टमध्ये लावायची आहे. तर याच्या LNB OUT पोर्टमधून दुसऱ्या केबलचे कनेक्शन MPEG-4 च्या LNB IN मध्ये फीट करायची आहे.


> MPEG-4 बॉक्सला दुसऱ्या खोलीत ठेवा. आता तुम्ही दोन्ही बॉक्सवर वेगवेगळे चॅनल्स पाहू शकतात.

X