आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या पडद्यावर दाखवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, आपल्या ड्रीम प्राेजेक्टविषयी बोलला निर्माता रितेश देशमुख

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण, मुंबई : सध्या ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. रितेश देशमुख महाराजांवर चित्रपट बनवणार आहे. रितेशने स्वत: आपल्या या ड्रीम प्रोजेक्टविषयी दैनिक दिव्य मराठीला सांगितले. रितेश स्वत: या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यात तो शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तो हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत करणार आहे.


रितेशने यासाठी त्याने 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. यात तो अजय-अतुल यांनाहीसोबत घेणार आहे. हा रितेशचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. हा चित्रपट झाल्यानंतरच तो दुसरा चित्रपट हातात घेणार आहे. हा चित्रपट 2021 पर्यंत पडद्यावर येणार असल्याचे रितेशने सांगितले. लवकरच तो यासाठी इतर कलाकारांची निवड करणार आहे.

150 कोटी रुपयेही कमी पडतील

  • तयारी

आम्ही नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली. यासाठी तयारी करण्यात आम्हाला बराच वेळ लागेल. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. यापूर्वीदेखील आम्ही चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र तेव्हा गोष्टी जुळून आल्या नव्हत्या. त्यांनतर आम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. 

  • ऑथेंटिसिटी

खरंतर, या चित्रपटाबाबत भरपूर मापदंड आहेत. आम्ही या कथेला नाट्यमय करू शकणार नाही. थोडक्यात आम्हाला यात सर्व तथ्य मांडावे लागणार आहेत. आम्हाला त्यांचे जीवन जशाच्या तसे पडद्यावर मांडावे लागणार आहे. सध्या तरी संशोधन सुरू आहे. उपलब्ध कागदपत्र आणि इतिहास तज्ञांच्या सांगण्यानुसार कथा तयार करण्यात येईल. मात्र प्रत्येक दिग्दर्शकाची कथा सांगण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे आमचा चित्रपट भव्य आणि वेगळा असेल.

  • बजेट

सध्यातरी बजेटची काही चिंता नाही. खरंतर, ऐतिहासिक चित्रपट करायचा म्हटल्यावर बजेट भरपूर लागेल, त्याची तयारी सुरू आहे. 150 कोटी रुपयेही कमी पडतील, असे मला वाटते. कमी बजेटमध्येही अनेक चांगले चित्रपट बनले आहेत. मीदेखील तसाच प्रयत्न करणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...