आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Producer Shailesh R Singh Said 'In 'Judgmental Hai Kya', No Scenes Of Rajkumar Had Cut, Nor Kangna Invested Money'

प्रोड्युसर शैलेश आर. सिंह म्हणाले - 'जजमेंटल है क्या' मध्ये ना राजकुमारच्या दृश्यांना कात्री लागली, ना कंगनाचा पैसा लागला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'जजमेंटल है क्या'मध्ये कंगना रनोटच्या तुलनेत राजकुमार राव व जिमी शेरगिलच्या पात्रांची लांबी कमी करण्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. तांत्रिक विभागाशी संबंधित लोकांपैकी काहींचे म्हणणे आहे की, असे झाले आहे. याबाबत निर्माता, दिग्दर्शक आणि सहायक दिग्दर्शकांमध्ये सर्जनशीलतेबाबत मतभेद असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच कदाचित विदेशी मार्केटसाठी चित्रपटाची वेगळी प्रिंट घेण्यात आली असावी. हेही ऐकण्यात आले की, यामध्ये कंगनाचा पैसा लागलेला आहे. ती नायिकाच नाही, तर सहनिर्मातीसुद्धा आहे. जाणून घेऊया समोर आलेले वादग्रस्त मुद्दे... 

 

प्रॉडक्शन टीमने केले हे वादग्रस्त दावे...  
- चित्रपटात जिमी शेरगिलचे पात्र 80 टक्के कापण्यात आले. 
- निर्माते शैलेश आर. सिंह आणि दिग्दर्शकामध्ये गेल्या वेळी जोरदार वाद झाले होते. 
- विदेशात चित्रपटाचे वेगळे संगीत गेले. 
- रिलीजच्या एक दिवस आधीपर्यंत चित्रपटाच्या साउंड मिक्सिंग,एडिटिंगचे काम सुरू होते. 
- गेल्या वर्षी तयार झालेला ड्राफ्ट, रिलीज झाल्यावर पूर्णपणे वेगळा कट समोर आला. 

 

प्रोड्युसर शैलेश आर. सिंह म्हणाले, 'आम्ही एक प्रयोगशील चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवण्याची आमची संकल्पना होती. कदाचित काही लोकांना ती आवडली नसावी, परंतु वेगळे काही तरी करण्याचा आमचा प्रयत्न होता. आमच्या प्रामाणिकपणावर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये. मी पुढेही प्रयोगशील चित्रपट करत राहीन. माझा आगामी चित्रपट 'हुड़दंग' मंडल आयोगावर एक टेक आहे.'  

 

यामुळे जास्त आहे कंगनाची भूमिका...  
निर्मात्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही महिला शक्ती प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणपणे दुर्गेला शक्तीचे रूप मानले जाते, परंतु आम्ही या चित्रपटात सीतेचे मॉडर्न इंटरप्रिटेशन केले आहे. साहजिकच चित्रपटात कंगनाचे पात्र इतरांच्या तुलनेत जास्त राहील. 

 

या दृश्यांना लागली कात्री...  
- जुन्या ड्राफ्टमध्ये जिमी शेरगिलचे पात्र मध्यंतरानंतर क्लायमॅक्सपर्यंत होते. तो जवळपास प्रत्येक दृश्यात कंगनासोबत होता. यापैकी अनेक दृश्ये कापण्यात आली. 
- लेखिका कनिका ढिल्लों यामध्ये रामायणाचे मॉडर्न इंटरप्रिटेशन करते. हे दृश्यही लांबलचक होते, परंतु तेही कमी केले. तेव्हा कुठे याची लांबी 121 मिनिटे झाली. 
- अखेरचे दृश्य 12 मिनिटांचे होते. त्यात राजकुमार रावची उपस्थिती होती, परंतु ते दृश्य कापून फक्त 7 मिनिटांचे करण्यात आले आहे. 

 

दिग्दर्शक स्वत: घेऊन आले सहायक...  
दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश कोवेलामुदी सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र यामध्ये सहायक दिग्दर्शक होते. अशा वेळी सर्जनशीलतेबाबत मतभेद असण्याचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा ठरतो. दिग्दर्शकाऐवजी त्याच्या सहायकाने काम आपल्या हाती घेतले, असेही कुठे झालेले नाही. आपले सहायक दिग्दर्शक प्रकाश स्वत:च घेऊन आले होते. 

बातम्या आणखी आहेत...