आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Producers Keen To Make Films On Political Tactics In Maharashtra, Competition For Title Registration Begins

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील राजकीय डावपेचांवर चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक आहेत प्रोड्यूसर्स, टायटल रजिस्ट्रेशनसाठी सुरु झाली स्पर्धा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : फिल्ममेकर्स महाराष्ट्रात सुमारे एक महिना चाललेली राजकीय उठाठेव मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. त्याण्ड्च्यात चित्रपटाचे टायटल रजिस्टर्ड करण्याची स्पर्धा सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन (आयएमपीपीए) मागच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी 5 ते 10 टायटल रजिस्ट्रेशनचे अर्ज आले आहेत. यामध्ये 'चाणक्य का खेल', 'महागठबंधन' 'अघाड़ी', 'महायुती' आणि 'साहेब' यांसारखे टायटल सामील आहेत. 

टी-सीरीजसारख्या प्रोडक्शन कंपनी घेत आहेत रस.... 


मिड डेच्या रिपोर्टमध्ये आयएमपीपीएच्या एका जवळच्या सूत्राच्या हवाल्याने लिहिले गेले आहे की, टी-सीरीजसारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणावर चित्रपट बनवण्यात इंटरेस्ट घेत आहेत. मात्र टायटल रजिस्टर्ड करण्याची प्रक्रिया खूप स्लो आहे. एक अर्ज प्रोसेसमध्ये आणण्यासाठी 40-50 दिवसांचा वेळ लागतो. ही प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यासाठी प्रीमियम फीस द्यावी लागते जी 3 हजार रुपये आहे. अनेक टॉप स्टूडियोजने ही फीस दिली आहे. जेणेकरून त्यांना एका आठवड्यात रिस्पॉन्स मिळेल आणि महिन्याभराची वाट पाहावी लागु नये.  

ओरिजनल सब्जेक्ट खरे सोने.... 


या रिपोर्टमध्ये ट्रेड एक्सपर्ट आमोद मेहरा यांच्या हवाल्याने लिहिले गेले आहे की, अशावेळी जिथे अनेक रीमेक बनत आहेत. तिथे याप्रकारचे खरे विषय फिल्ममेकर्ससाठी खरे सोने ठरू शकते. 


24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल समोर आले होते. त्यानंतर सोबत निवडणूक लढवले भाजपा-शिवसेनामध्ये फूट पडली आणि सरकार बानू शकले नाही. त्यानंतर राष्ट्रपती शासन, महाआघाडीचे सोबत येणे, भाजपा-एनसीपीचे गुपचुप सरकार बनणे, सुप्रीम कोर्टच्या फ्लोअर टेस्ट करण्याच्या निर्णयानंतर आधी उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार, नंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांचे राजीनामे आणि फायनली शिवसेना-एनसीपी-काँग्रेसचे सरकार बनणे. सर्वकाही बरेच ड्रामेटिकल होते. हेच कारण आहे की, फिल्ममेकर्सला यामध्ये खूप मसाला दिसत आहे.  

बातम्या आणखी आहेत...