आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Producing 10 Thousand Baskets Of 'Do Not Put Food Ramains In Plate' Message; Jain, Maheshwari, Dhicha's Unique Efforts

‘उष्टे टाकू नका’चा संदेश देणाऱ्या १० हजार थाळ्यांची निर्मिती; जैन, माहेश्वरी, धांची समाजाचा अनोखा प्रयत्न, भोजनशाळा-केटरर्सचा संदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेधपूर - भारतात दरराेज जेवढे भाेजन तयार केले जाते, त्यापैकी ४० टक्के अन्नाची नासाडी हाेते, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. वर्षभरात देशात ५० हजार काेटी रुपयांहून जास्त किमतीच्या भाेजनाचा अपयव्य हाेताे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. विवाह भाेजनावळी, पार्ट्या, हाॅटेल-भाेजनालये इत्यादी ठिकाणी नासाडी हाेते. दुसरीकडे देशात लाखाे लाेकांना रात्र उपाशीपाेटी काढावी लागते. या समस्येवर ताेडगा काढण्यासाठी जयपूर शहरातून माेठा पुढाकार घेण्यात आला आहे. ताटात उष्टे टाकू नये यासाठी जागृती माेहीम हाती घेण्यात आली आहे. आता येथील थाळ्यांवर ‘कृपया उष्टे टाकू नका’ अशा आशयाचा संदेश वाचायला मिळणार आहे. शहरातील विविध समाज व केटरर्सनी आपल्या थाळ्यांवर हा संदेश लेझर प्रिंटने माेठ्या माेठ्या अक्षरातून दिला आहे. केवळ पंधरा दिवसांत २ टन स्टीलच्या १० हजार थाळ्यांद्वारे हा संदेश देण्यात आला आहे. 


एक महिन्यापूर्वी जैन भाेजनशाळेने त्यासाठी पुढाकार घेतला हाेता. समदडी भागातील श्री कुंथुनाथ जैन मंदिराचे जयंतीलाल पारख समाजाच्या एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तेथे त्यांनी अशा प्रकारच्या थाळ्या बघितल्या. तेथे लाेक उष्टे अन्न टाकून देत नव्हते. त्यासाठी त्यांनी आयाेजकांकडून नमुना म्हणून एक थाळी साेबत घेतली .राजस्थान स्टेनलेस स्टील युटेन्सियल असाेसिएशनचे सचिव राजेश जिरावला म्हणाले, महिन्यात १० हजार थाळ्या बनतील, असे अपेक्षित आहे. 
 

 

तीन पावले: एक विशेष टीम लोकांना उष्टे टाकून देऊ नका असा संदेशही देते

> उष्टे खाऊन उष्टे टाकून देण्याची सवय केली बंद 
जाेधपूरमध्य जानेवारीत माहेश्वरी ग्लाेबल कन्व्हेन्शन अँड एक्स्पाेमध्ये परिवर्तनाचा अनाेखा उपक्रम पाहायला मिळाला. महामेळ्याच्या निमित्ताने एक लाख लाेकांसाठी महाप्रसादही ठेवला होता. आयाेजकांनी एक टीम तयार केली हाेती. ताटात उष्टे ठेवू नका, अशी विनंती लाेकांना केली हाेती. परंतु काहीचे उष्टे कार्यकर्त्यांच्या त्या टीमने खाण्यास सुरुवात केली. तेव्हा उपस्थितांना चूक उमजली.  
 

> धांची समुदायाने स्त्री-५०, पुरुष-५० अशी टीम 
१६ जून राेजी धांची समाजाच्या ८८५ व्या स्थापना दिनी महाप्रसाद हाेता. सुमारे १२ हजार लाेकांची भाेजनाची व्यवस्था केली हाेती. कार्यक्रमाचे संयाेजक किशनलाल बाेराणा म्हणाले, लाेकांनी उष्टे टाकून देऊ नये यासाठी ५० महिला व ५० पुरुषांची टीम तयार करण्यात आली हाेती. या टीममधील प्रत्येक सदस्याने महाप्रसादासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून विनंती केली. त्यामुळे लोकांचे वर्तन सुधारले. 

 

> उष्टे टाकून देणाऱ्यांची नावे स्टेजवरून जाहीर केली
शहरातील एक शिक्षक राहुल राठी व विनीता भुतडा यांच्या विवाहाच्या भाेजनावळ हाेती. पाहुण्यांना उष्टे टाकू द्यायचे नाही, असा निर्धार वधूपक्षाने केला. राहुलचा मावसभाऊ विजय साेनी यांनी त्यासाठी चार पातळ्यांवर व्यवस्था केली. फ्लेक्स लावले हाेते. त्यावर थाळीत उष्टे टाकून देऊ नका, असा संदेश दिला हाेता. आचाऱ्यांचीही मदत घेतली. उष्टे टाकून दिले जाणाऱ्यांची नावे स्टेजवरून जाहीर करून सांगितली.