Home | News | produser ashok pandit blasted on kanhaiya kumar said he is a terrorist

कन्हैया कुमारच्या स्टेटमेंटवर भडकले प्रोड्यूसर अशोक पंडित, म्हणाले - 'तू एखाद्या दहशतवाद्यापेक्षा कमी नाही, हा देश तुला माफ करणार नाही 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 04:45 PM IST

सोशल मीडिया यूजर्सनेही कन्हैया कुमारला सुनावले खडे बोल...  

 • produser ashok pandit blasted on kanhaiya kumar said he is a terrorist

  मुंबई : बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या कन्हैया कुमारला फिल्म प्रोड्यूसर अशोक पंडितने जबरदस्त सुनावले आहे. पंडितने आपल्या ट्वीटमध्ये त्याला देश तोडणारा आणि दहशतवादी म्हणले आहे. झाले असे की, कन्हैयाने ट्विटरद्वारे बेरोजगारीच्या मुद्यावर आपले मत मांडले. त्याने लिहिले, "ही लढाई, शिक्षण आणि कढईच्या मधली आहे. एकीकडे ते लोक आहेत, जे शिक्षण घेऊन आपले आणि देशाचे भविष्य घडवू इच्छितात तर आणि दुसरीकडे ते जे या शिकल्या सावरलेल्या मुलनाकडून 200 रु. वर भजी तळून घेऊ इच्छितात. एखाद्या इंजीनियरचे नाईलाजाने नावाडी बनणे रोजगार नव्हे, तर सरकारी तत्वांचा अत्याचार आहे."

  अशोल पंडित म्हणाले - तू दहशतवादी आहेस...
  कन्हैयाच्या ट्वीटवर उत्तर देताना अशोक पंडितने लिहिले आहे, "तू तिन्ही categories मध्ये येत नाहीस, कारण तू देशाचे तुकडे तुकडे करू इच्छितो ! तू एका दहशतवाद्यापेक्षा काही कमी नाहीस ! हा देश तुला माफ करणार नाही ! डिपॉजिट तर जब्त होणारच तुझे "

  सोशल मीडिया यूजर्सदेखील ऐकवत आहेत खडे बोल...
  सोशल मीडिया यूजर्सदेखील कन्हैया कुमारला खूप फटकारत आहेत. एका यूजरने लिहिले, "पण असे नाहीये. काही कु$# जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा करूनही आपले करियर बनवतील." एका यूजरची कमेंट आहे, "कन्हैया कुमार ही लढाई देशभक्त आणि तुकडे गॅंगमधील आहे. एकीकडे मोदी सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे टुडे करत आहेत तर दुसरीकडे तुकडे गॅंग दहशतवाद्यांचे समर्थन करून भारताचे तुकडे होणायचे स्वप्न पहाते." आणखी एका यूजरची कमेंट आहे, मी एक इंजीनियर आहे आणि मला माझा देश आणि मोदीजींचा अभिमान आहे आणि हो, या देशाच्या चौकीदारापासून जरा सावध राहा, कारण हा नवीन भारत आहे, प्रत्येक दहशतवाद्याला घरात घुसून मारतो." एका यूजरची कमेंट आहे, "धर्म बदलून देश विकण्यापेक्षा चांगले आहे भजी तळा."

Trending