आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prof Kishor Parkhe Writes About Personality Of Humans

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथम तुज पाहता...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 प्रा. किशोर पारखे

First impression is the last impression  हे अगदी  खरं आहे . प्रथमदर्शनी जे मत तयार होते ते दीर्घकाळापर्यंत टिकते. तुमचे विचार, स्वभाव हे पूर्ण दिसत नसले तरी एक सकारात्मक बाजू ते तयार करतात हे मात्र नक्की.


कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे भाग असतात, बाह्य व अंतर्गत. बाह्य व्यक्तिमत्त्व प्रथमदर्शनी छाप पाडण्यास कारणीभूत असते तेव्हा याचा विकास पण महत्त्वाचा आहे. First impression is the last impression हे अगदी  खरं आहे. प्रथमदर्शनी जे मत तयार होते ते दीर्घकाळापर्यंत टिकते. तुमचे विचार, स्वभाव हे पूर्ण दिसत नसले तरी एक सकारात्मक बाजू ते तयार करतात हे मात्र नक्की. बाह्य घटक कोणते असतात ते जरा थोडक्यात समजून घेऊ

१ प्रसन्न मुखदर्शन - आपल्याला  पाहिल्याबरोबर समोरील व्यक्तीला प्रसन्न वाटायला पाहिजे, त्याला तसा अनुभव आला पाहिजे म्हणून हसतमुख चेहरा असायलाच पाहिजे. 

२ सत्यवचन - आपण जेवढे प्रामाणिक व सत्य बोलून आपली प्रतिमा तयार करू ती दीर्घकाळ टिकणारी असेल. आपल्या मित्र-मैत्रिणींचा आपल्यावरील विश्वास ही आपली जमेची व सर्वात महत्त्वाची बाजू आहे हे विसरू नका. आपले शिक्षक आपल्यावर निश्चित विश्वास दाखवून आपल्या व्यक्तिमत्त्वात आणखी भर टाकतील हे पण निश्चित आहे, अन्यथा हे सर्व तुमच्यापासून दूर  जाणार हे नक्की

३.मधुर संभाषण - हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक अलंकार आहे. कम बोलो, मीठा बोलो, धीरे बोलो. आपल्या बोलण्याने कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. थोडक्यात काय तर, तोंड चांगले असणे गरजेचे आहे. नाहीतर लोक दूर जाणार व  कुणीच जवळ राहणार नाही हे लक्षात ठेवा.

४. सात्त्विक आचरण - याची खासकरून काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या युगाची ती गरज आहे. कोणतेही व्यसन असता कामा नये. कुणीही व्यसनी व्यक्तीला मानसन्मान देत नाही हे लक्षात ठेवा. कुणाला चिडवायचे, डिवचायचे,  अश्लील हावभाव, संभाषण, टाँट मारणे, एखाद्या मित्र-मैत्रिणीला उगाच जास्त आग्रह करणे, एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे ह्या गोष्टी कटाक्षाने टाळा. किंबहुना या मुळीच नको, अन्यथा तुमचे मित्र-मैत्रिणी तुमच्यापासून दूर जातील हे नक्कीच. 

तेव्हा कॉलेजकुमारांनो, ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत तेव्हा First impression is the last and best impression हे लक्षात ठेवा आणि  तसेच वागा आणि तुमचे व्यक्तिमत्त्व घडवा.  आज केवळ सुशिक्षित तरुण नको आहेत  तर सुसंस्कारित तरुण पाहिजे आहेत. नाही तर लोकांनी तुम्हाला पाहून “दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते “ “हर एक दोस्त कमीना होता है” “एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोक “ “ दोस्त दोस्त ना रहा” ही गाणी म्हटली तर आश्चर्य वाटू नये.
 
लेखकाचा संपर्क -  9822836372