आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Professional Photography Can Be Done Through Smartphones With Composition And Focusing

कम्पोझिशन आणि बरोबर फोकसिंगने स्मार्टफोनमधून करू शकता प्रोफेशनल फोटोग्राफी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- असे मानले जाते की, मोबाईलचा कॅमेरा प्रोफेशनल कॅमेरांचे बरोबरी करू शकत नाही. पण, आजकाल मोबाईल कंपन्या आपल्या मोबाईलच्या कॅमेरांना एकदम चांगल्या क्वालिटीचे बनवत आहेत. त्यामुळे अनेक फोटोग्राफर्स मोबाईलनेच चांगले फोटो काढत आहेत. फोनच्या कॅमेरातून चांगले फोटो काढण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.एचडीआर मोड यूज करा
 
अता बहुतांश मोबाईलमध्ये एचडीआर (हाय डायनॅमिक रेंज) ऑप्शनची सुविधा आहे. याच्या मदतीने ब्राइट आणि डार्क एरियामधील गोष्टींचा चांगला फोटो काढता येतो आणि सर्व डिटेल्स चांगल्या पद्धतीने दिसतात. दुपारच्या उन्हात चांगले फोटो काढण्यासाटी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

 

फोकसिंग
 
बरोबर फोकसिंगने फोटो चांगला येतो. जे स्मार्टफोन्स रिफोकसिंगचे ऑप्शन देतात, त्यात जिथे फोकस करायचं, तिथे स्क्रीनवर टच करुन फोकस केले जाते. ज्यांच्या फोनमध्ये हे ऑप्शन नाहीये, त्यांच्यासाठी प्ले स्टोरवर रिफोकसिंग अॅप्स आहेत. या ऑपश्नमधून फोटो काढल्यास आपला सबजेक्ट चांकला दिसतो.

योग्य लाइटची निवड
 
सुर्योदयानंतर किंवा सुर्यास्तानंतरचा वेळ फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट मानला जातो. या दरम्यान तुम्ही चांगले लँडस्केप शॉट घेऊ शकतात. यातून प्रोट्रेट शॉट्सदेखील चांगले येतात. 

 

कम्पोजिशन
 
बहुतांश फोनमद्ये ग्रिड व्ह्यूचे ऑप्शन असते. यात फोनच्या स्क्रीन लाइन्सच्या माध्यमातून 'द रूल ऑफ थर्ड'चा वापर करु शकता. याचा अर्थ तुमचा सबजेक्त एखाद्या लाइनवर किंवा लाइन क्रॉस होत आहे, तिथे असायला हवा. त्याशिवाय झूमचा चांगला वापर करा.

हे काही पर्याच आहे, याचा उपयोग करुन तुम्ही चांगले फोटो काढू शकत.

बातम्या आणखी आहेत...