आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील कीडयुक्त गुलाब निर्यातीला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतातून निर्यात होणाऱ्या गुलाबावर कीड व राेग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या फुलांच्या अायातीवर निर्बंध घातले आहेत.  महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुलाब परदेशात निर्यात होतात. यापैकी तब्बल ९५ टक्के गुलाब एकट्या ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले जातात. मात्र, अाता या देशाने घातलेल्या निर्बंधामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका गुलाब उत्पादक आणि निर्यातदार कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.  


महाराष्ट्रातून रोज सरासरी चार ते पाच लाख गुलाबांची निर्यात होते. फळ, भाजीपाला आणि फुले निर्यात करताना त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र (फायटो सर्टिफिकेशन) घ्यावे लागते. त्यासाठी कृषी विभागाने देशभरात फायटोसॅनिटरी इन्स्पेक्टर नेमलेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अाॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दाेन्ही देशांनी भारतातून येणारा गुलाब कीडयुक्त असल्याचे सांगत तो खरेदी करण्यास नकार दिला अाहे. यावरून भारतात कृषी खात्याने नेमलेल्या इन्स्पेक्टरकडून याेग्य तपासणी न करताच कीड आणि आजारमुक्त गुलाब असल्याबाबत चुकीचे प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समाेर अाले अाहे.  


ऑस्ट्रेलियन प्रतिनिधींची चर्चा  : ऑस्ट्रेलियातील आयातदारांनी भारतातील गुलाब घेण्यास नकार दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत. २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी मंत्रालयात फलोत्पादन विभागातील अधिकारी आणि येथील निर्यातदार कंपन्यांशी चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या मानकापेक्षा ५१ टक्के कमी प्रतीचा गुलाब येत असल्याची त्यांची तक्रार अाहे. यात सुधारणा करून हे प्रमाण किमान ३० टक्क्यांपर्यंत आले तर भारतातून पुन्हा गुलाब आयात करण्याची भूमिका अाॅस्ट्रेलियन प्रतिनिधींनी मांडली. महाराष्ट्रातील बैठकीनंतर हे प्रतिनिधी कर्नाटकात गेले असून तेथेही निर्यातदार आणि तेथील फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर हे प्रतिनिधी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील आयातदारांशी चर्चा करतील, त्यानंतरच भारतातून गुलाब आयात करण्याबाबतचा अाॅस्ट्रेलियाचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.  

 

- 5लाख गुलाबांची  राेज महाराष्ट्रातून निर्यात. 

- 95%फुलांची एकट्या अाॅस्ट्रेलियात हाेते निर्यात.

- 15 रुपये कमाल प्रतिनग दर मिळताे निर्यात केलेल्या फुलास.

- 51 कमी दर्जाची फुले निर्यात हाेत असल्याची अाॅस्ट्रेलियाची तक्रार. 

 

> स्थानिक बाजारात कवडीमाेल दर 
भारतीय गुलाबांची खरेदी करण्यात अाॅस्ट्रेलियन बाजारपेठेचा माेठा वाटा अाहे. सप्टेंबर ते मार्चपर्यंत हा गुलाब निर्यातीसाठीचा खास हंगाम आहे. या दरम्यान निर्यात होणाऱ्या गुलाबाला सरासरी १० ते १५ रुपये प्रतिनग भाव मिळताे. मात्र, अाता ऐन हंगामातच निर्यात थांबल्याने उत्पादक आणि निर्यातदारांचे हे अर्थचक्र कोलमडण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेत अावक वाढल्यास कवडीमाेल दरात फुले विकण्याशिवाय त्यांच्यासमाेर पर्याय नसेल.  
निर्यातदारांनी काळजी घ्यावी.

  
> ऑस्ट्रेलियन प्रतिनिधींनी उत्पादकांसाठी काही सूचना केल्या अाहेत, प्रशिक्षणही दिले. त्यांच्या मानकाप्रमाणे गुलाब मिळाल्यास पुन्हा आयात करू, असे अाश्वासन त्यांनी दिले आहे. भारतातून निर्यात सुरू झाल्यानंतर ३१ मार्च २०१९ पर्यंत त्यांना सुधारणा वाटली तर पुढेही निर्यात कायम होऊ शकेल. निर्यातदारांनीही कीडमुक्त गुलाब कसा निर्यात होईल, हे पाहिले पाहिजे.   
- माणिक त्र्यंबके, उपसंचालक, फलोत्पादन विभाग

बातम्या आणखी आहेत...