आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समृध्दी'ची रक्कम खर्च करण्यास मनाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा (लाड)- समृध्दी महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीपोटी मिळालेली कोट्यवधीची रक्कम खर्च करण्यास सहधर्मदाय आयुक्त अमरावती न्यायालयाने मनाई आदेश काढून स्थानिक गुरुमंदीरच्या विश्वस्तांना झटका दिला आहे. 


कारंजा-मूर्तिजापूर रस्त्यावर रस्त्यावर मौजे शहा गट क्र.२१४ मध्ये येथील गुरूमंदिर संस्थानच्या मालकीची एकूण ६ हेक्टर ३७ आर शेतजमीन आहे. पैकी २ हेक्टर ३९ आर शेतजमीन महाराष्ट्र शासनाच्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी अधिग्रहित करणे आवश्यक असल्यामुळे उपअधीक्षक कारंजा तालुका भूमि अभिलेख कार्यालयाने २१ मार्च २०१७ रोजी शेतजमीन मोजणीची नोटीस गुरुमंदीर विश्वस्त मंडळास पाठविली. ३० मार्च २०१७ रोजी मंदीर विश्वस्तांच्या उपस्थितीत भूसंपादनाच्या हेतूने शेतीची मोजणी पुर्ण झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी २६ जून २०१८ रोजी वाशीम जिल्हा भूसंपादन समितीव्दारे या शेतजमिनीची किंमत ९ कोटी ११ लाख ९१ हजार ७६९ रुपये इतकी निर्धारित केली असल्याचे विश्वस्त मंडळास सूचित केले. दरम्यान, उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार ६ मे २०१६ रोजी विश्वस्त मंडळाने हमीपत्र दाखल केले की देवस्थानच्या आर्थिक धोरणाबाबतचे निर्णय सहधर्मदाय आयुक्त अमरावती यांच्या अनुमतीनेच घेण्यात येतील. त्यानुसार गुरुमंदीर विश्वस्त मंडळाने २० जुलै २०१८ रोजी अमरावती येथील धर्मदाय सहआयुक्त न्यायालयात अर्ज सादर करुन हा खरेदी व्यवहार करण्याची तसेच ९ कोटी ११ लाख ९१ हजार ७६९ रुपये या रकमेवरील मिळणारे व्याज खर्च करण्याची अनुमती मागितली. परंतु, २३ आॅगस्ट २०१८ रोजी धर्मदाय न्यायालयाने मिळणारी रक्कम ही मंदिराची संचित ठेव असल्याचे सांगून ती खर्च करण्यास मनाई केली. 
तसेच मिळालेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षासाठी मुदत ठेव पावतीच्या स्वरुपात गुंतवण्यात यावी.तसेच व्याजाची रक्कम सुध्दा धर्मदाय सहआयुक्त यांच्या अनुमतीविना खर्च करु नये असे निर्णयात नमुद केले आहे. 


खोटा अहवाल सादर केल्याप्रकरणी गुन्हा 
कारंजा : मंदिरासंबंधी खोटा वार्षिक अहवाल सादर करणे तथा शासकीय अधिकाºयांना खोटे दस्ताऐवज पुरवून चौकशीसाठी भाग पाडल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी एका जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 


प्राप्त माहितीनुसार, दिलीप हिरासा राऊळ (५६, रा.नेवीपुरा) यांनी फिर्यादीत म्हटले की, आरोपी अविनाश इंद्रजीत मुधोळकर (रा.चवरे लाइन, कारंजा) यांनी १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ पर्यंत स्थानिक गांधी चौकातील एका मंदिराचा हेतुपुरस्परपणे खोटा वार्षिक अहवाल सादर केला.त्यामुळे मंदिरची बदनामी झाली. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ४६६, ४६८, ४६९, ४७०, ४७४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार करीत आहे. 


शेखर काण्णव यांचा आक्षेप 
गुरुमंदीर विश्वस्त मंडळाने शेतजमीन ३० आॅगस्ट २००० रोजी ४ खरेदी खतांन्वये विकत घेतली. महाराष्ट्र सार्वजनिक व्यवस्था अधिनियमाप्रमाणे या मिळकतीची नोंद ९० दिवसात धर्मदाय न्यायालयाच्या अनुसूची १ या पुस्तकात घेणे कायद्याने बंधनकारक होते.पण विश्वस्त मंडळाने तसे केले नाही म्हणून शेखर काण्णव यांनी अमरावती धर्मदाय न्यायालयातील प्रकरणात याविषयी आक्षेप घेतला. त्यामुळे विश्वस्त मंडळाने सन २००० मधील खरेदीचे व्यवहार अनुसूची १ मध्ये नोंदविण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे ठराव करुन वाशीम धर्मदाय न्यायालयात २१ मे २०१३ रोजी एकूण २२ बदल अर्ज विविध मिळकतीच्या स्वरुपात दाखल केले. वाशीम धर्मदाय न्यायालयात विश्वस्तांनी आजपर्यंत एकूण २५ बदल अर्ज सादर केले असून, त्यापैकी १५ अर्जाबद्दल शेखर काण्णव यांनी आक्षेप घेतला आहे. 

बातम्या आणखी आहेत...