आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदींच्या काळात सुरू झालेले प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण होतात', अमित शहा यांचा काँग्रेसला टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : काँग्रेसच्या काळात विकासाचे प्रकल्प प्रदीर्घ काळ रेंगाळायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालेले प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण होतात, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपुरात बोलताना काँग्रेसला टोला लगावला.

नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या कॅम्पसचे लोकार्पण आणि एनडीआरएफ अकादमीच्या कोनशिला समारंभात गृहमंत्री शहा बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अग्निशमन सेवा महासंचालक नागेश्वरराव या वेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या राजवटीत प्रकल्प कसे रेंगाळायचे, याचा उल्लेख करून अमित शहा म्हणाले की, प्रकल्पाचे भूमिपूजन एकाच्या, कामाची सुरुवात दुसऱ्याच्या, तर प्रकल्प पूर्ण मात्र तिसऱ्याच्या कार्यकाळात व्हायचे. ते चित्र मोदी सरकारने बदलले. आता पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सुरू झालेले प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण होतात. ही मोठी उपलब्धी असल्याचा दावा त्यांनी केला.

२०१६ पासून केंद्राने आपत्ती व्यवस्थापनाची एनडीआरआफ ही यंत्रणा मजबूत करण्याच्या दिशेने मोठे प्रयत्न केलेत. या यंत्रणेचे नेटवर्क आता जिल्हास्तरापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत देशात १० हजार लोकांना प्राण गमावावे लागल्याचे उदाहरण असताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सशक्त होत असल्याने मागील तीन चक्रीवादळांच्या आपत्तीमध्ये प्राणहानीचे प्रमाण कमी करण्यात मोठे यश आले व ६६ लोकांना प्राण गमावावे लागले. नैसर्गिक आपत्तीपायी प्राणहानी होऊच नये, या दिशेने काम होण्याची गरज आहे.

नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या कॅम्पसचे लोकार्पण आणि एनडीआरएफ अकादमीच्या कोनशिला समारंभात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सार्क देशांच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

नेपाळमधील भूकंपाच्या आपत्तीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रथम एनडीआरफची पथके पोहोचली होती. याचा उल्लेख करताना नागपुरात साकारत असलेल्या अकादमीत सार्क देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय व्हावी, अशी अपेक्षा शहांनी व्यक्त केली.
 

बातम्या आणखी आहेत...