आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Promoting Foreign Investment, Compelling Domestic Investors; Six Slabs For The First Time Ever, Budget News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी गुंतवणुकीला चालना, देशी गुंतवणूकदारांवर सक्ती; प्राप्तिकरासाठी पहिल्यांदाच सहा स्लॅब

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन स्लॅब नाकारणे एवढीच करदात्यांना सवलत
  • जुना स्लॅबही हळूहळू संपवण्याचे संकेत अर्थसंकल्पात दिले

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये एकीकडे विदेशी गुंतवणुकीला चालना दिली, पण देशातील गुंतवणूकदारांसाठी कडक धोरण व देखरेख वाढवली आहे. सामान्य करदात्यांसाठी प्रामुख्याने सहा कर स्तरांचा नवीन कररचना सादर केली आहे.

केंद्राचे १६.३५ लाख कोटी रुपये (राज्यांचा वाटा वजा करून) महसूल मिळवण्याचे लक्ष्य आहे. केंद्रानेे विदेशी पोर्टफोलिआे गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) काॅर्पोरेट बाँडची केंद्र सरकारने परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) कॉर्पोरेट रोखे मर्यादा सध्याच्या थकबाकीच्या नऊ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. निवडक सरकारी सिक्युरिटी बाँड  स्थानिक गुंतवणूकदारांबरोबर अनिवासी गुंतवणूकदारांसाठी खुले करण्यात आले आहेत.

आतापर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करण्यास ते पात्र नव्हते.३१ मार्च २०२४च्या अगोदर जर विदेशी सरकारच्या साॅवर्जिन वेल्थ फंडांकडून प्राधान्यकृत क्षेत्रात (पायाभूत) कमीत कमी तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर परताव्यावर व्याज, लाभांश व भांडवली मिळकत यामध्ये शंभर टक्के सूट देण्यात येईल. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. स्थानिक गुंतवणूकदारांना शेअर व म्युच्युअल फंडातून मिळणारा लाभांश आता कंपनी न भरता थेट गुंतवणूकदारांनाच कर भरावा लागेल. १८२ दिवसांपेक्षा जास्त दिवस भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय मानले जात होते. आता ही संख्या वाढवून २४० केली आहे. २४० पेक्षा कमी दिवस विदेशात राहणाऱ्या लोकांच्या विदेशी उत्पन्नावर कर आकारण्यात येईल. यात प्रामुख्याने मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे या कक्षेत येतील. सरकारने प्राप्तिकरात कोणतीही सवलत दिलेली नाही उलट सहा कर स्तर निवडण्याचा पर्याय करदात्यांना दिला आहे.

नवीन कर स्लॅबमध्ये बचत


{कर्मचाऱ्यांना निवृत्ती व मृत्यूनंतर 
मिळणारे लाभ

{ निवृत्तीनंतर एकरकमी पेन्शनचा लाभ

{निवृत्तीच्या सुट्यांची एकरकमी रक्कम

{ स्वेच्छा निवृत्तीच्या वेळी रक्कम. 

कमाल ५ लाख
 
{शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती

{समाजसेवेसाठी मिळणारी बक्षीस रक्कम

{एनपीएसमधून मिळणारी रक्कम. अल्पावधीत व मॅच्युरिटीनंतर.

{एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक

{नवीन कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतन  रकमेच्या कमाल ३०% अतिरिक्त  सूट

हेे प्रमुख पर्याय आता मिळणार नाही...


{पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट

{कलम ८० सी मध्ये उपलब्ध असलेली १.५ लाख रुपयांची सूट. जसे- एलआयसी, पीपीएफ.

{घरभाडे भत्ता

{गृहकर्ज भरल्यावरची व्याज रक्कम

{उच्च शिक्षणसाठी घेतलेले कर्ज फेडल्यानंतर मिळणारी व्याज रक्कम