आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बुधवारी ट्विटरच्या टॉप ट्रेंडिंगमध्ये पुरवेल बॉलिवूडचा दबदबा दिसला. एकीकडे जिथे बॉयकॉट दीपिका, बॉयकॉट छपाक, बॉयकॉट अक्षय कुमार यांच्यामध्ये आणखी एक हॅशटॅग ट्रेंड करत आहे, #तान्हाजी चॅलेंज. या चॅलेंजमध्ये यूजर्स अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' ची तिकिटे बुक करून तीन लोकांना फ्रीमध्ये देत आहेत. एवढेच नाही तिकीट बुक केल्यानंतर लोक त्याचे फोटोदेखील शेअर करत आहेत.
या चॅलेंजची सुरुवात भाजपा नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केली. त्यांनी स्वतःच देशातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या 10 लोकांना तिकीट बुक करून पाठवली आहेत. तसेच आपल्याच काही ट्विटर फॉलाेअर्सलाही या चॅलेंजसाठी टॅग केले आहे. त्यानंतर लोक तान्हाजी चॅलेंज स्वीकारत आहेत आणि लोकांना तिकिटे फ्रीमध्ये विकत आहेत.
10 जानेवारीला रिलीज होत आहे चित्रपट...
अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' 10 जानेवारीला रिलीज होत आहे. ज्यामध्ये सिंहगड किल्ल्याच्या विजयामध्ये सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची कथा दाखचली जाणार आहे. दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. चित्रपटात अजयव्यतिरिक्त काजोल, सैफ अली खान, शरद केळकर हेदेखील दिसणार आहे.
याप्रकारे चॅलेंज घेत आहेत यूजर्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.