आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Promotion Of Movie 'Saoho' Started, Prabhas And Shradha Looks Killer In The First Song Poster 'Psycho Saiya'

चित्रपट 'साहो'चे प्रमोशन सुरु, पहिल्या गाण्याचे पोस्टर 'सायको सैंया' मध्ये दिसला प्रभास-श्रद्धाचा किलर लुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बाहुबली स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट 'साहो' चे फर्स्ट सॉन्ग लवकरच रिलीज होणार आहे. स्वतः प्रभासने या पार्टी सॉन्गचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यामध्ये प्रभास आणि श्रद्धाचा किलर लुक दिसला आहे. चित्रपट साहो 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.  

 

 

चित्रपटात हेदेखील आहेत... 
सुजीतच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेल्या या चित्रपटात दोन्ही स्टार्सव्यतिरिक्त नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा हेदेखील एंटरटेनमेंटचा ताकद लावताना दिसणार आहेत.  

 

मोडला रोहित शेट्‌टीचा रेकॉर्ड... 
रोहित शेट्टी आपल्या चित्रपटांत गाड्या उडवणाऱ्या अॅक्शन सीक्वेंससाठी ओळखला जातो. यामध्ये आता मात्र 'साहो' चा डायरेक्टर सुजीतने त्याचाही रेकॉर्ड मोडला आहे. रोहितच्या चित्रपटात जिथे एक डजन गाड्या ब्लास्टमध्ये उडवल्या जायच्या. तिथे आता 'साहो'मध्ये सुजीतने सुमारे 5 ट्रक आणि 37 कार अॅक्शन सीनमध्ये उध्वस्त केल्या आहेत. 'साहो' मधील अॅक्शन अॅव्हेंजर्स आणि ट्रान्सफॉर्मर यांसारख्या चित्रपटांचे अॅक्शन डिजाइन केलेल्या टीमने डिजाइन केले आहे. 

 

तीन भाषांमध्ये शूट होणार पहिला चित्रपट... 
या चित्रपटात प्रभासच्या अपोजिट श्रद्धा कपूर दिसणार आहे. हिंदी, तेलगु आणि तामिळ भाषेमध्ये एकदाच शूट होणार हा भारतातील पहिला चित्रपट आहे. प्रभास आणि श्रद्धा स्वतः तीन भाषांचे सीन शूट करत आहेत. 'साहो' हा श्रद्धाचा पहिला चित्रपट आहे, जो दक्षिण भारतीय भाषांमध्ये शूट होणार आहे. त्यामुळे शूटिंगदरम्यान अनेकदा ती तेलगु शब्द चुकीचे उच्चारते. सूत्रांनी सांगितल्याप्रमणेर अशावेळी मग प्रभास शब्दांचे योग्य उच्चार करायला तिची मदत करत होता. याचप्रकारे जेव्हा प्रभास हिंदी डायलॉग्स चुकीचे उच्चारायचा तेव्हा श्रद्धा त्याचे उच्चार सुधारायची. 

बातम्या आणखी आहेत...