आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आंबेडकरांविरोधात मौलानांच्या माध्यमातून प्रचार ; एमआयएम खासदार जलील यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रकाश आंबेडकरांविरोधात प्रचार करण्यासाठी सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईतून मौलाना बोलावले होते. “अकोल्यात आंबेडकर जिंकणार आहेत, मग त्यांना इथे मतदान कशाला करता, त्यापेक्षा सुशीलकुमार शिंदेंना मतदान करा,’ असे आवाहन या मौलानांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळेच आंबेडकरांचा पराभव झाल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.


दलित समाजाची मते एमआयएमला मिळाली. मात्र, मुस्लिम समाजाची मते प्रकाश आंबेडकरांना मिळाली नसल्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता इम्तियाज म्हणाले, या प्रचारात काँग्रेससोबत असलेल्या मौलानांनी शिंदेंना मतदान करण्याबाबत सातत्याने आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वत:चे मतदारसंघ सोडून असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापुरात येऊन आंबेडकरांचा प्रचार केला. आता या निकालाचे विश्लेषण करावे लागणार आहे. ज्यांनी पक्षाचे काम केले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही इम्तियाज म्हणाले.  


एमआयएमच्या रूपाने काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय : या निवडणुकीत लोकांना काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय हवा होता. तो एमआयएमच्या रूपाने मिळाला आहे. एमआयएमकडून सर्वाधिक मागणी ओवेसी यांना होती. मात्र, प्रत्येक ठिकाणी त्यांना जाणे शक्य नव्हते. श्रीरापमपूरमध्ये आमचा पदाधिकारी वंचितचे काम करत नव्हता. मी त्याला निलंबित करण्याचे मंचावरूनच आदेश दिले होते. सोलापुरात काही ठिकाणी आम्हाला अहवाल मिळाले आहेत. त्याबाबत आंबेडकरांशी चर्चा करणार आहे. आंबेडकरांच्या आदेशामुळेच आंबेडकरवादी मतदान मला झाले आहे. त्यामुळेच गंगापूरमध्ये आमची शाखा नसतानाही भरघोस मते पडल्याचा दावा जलील यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...