आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदूषणविरोधी मास्क घालण्याची योग्य पद्धत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वायू प्रदूषण टाळण्यासाठी योग्य मास्क घालणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रदूषणविरोधी मास्क घालण्याची योग्य पद्धतदेखील माहीत असणे आवश्यक आहे. ते जाणून घ्या... सध्या बाजारात प्रदूषणविरोधी मास्क एन-95, एन-99, एन-100 आणि पी मालिका म्हणजे पी 95 आणि पी 100 मधील सर्वात योग्य आहेत, जे पीएम 2.5 प्रदूषकांना 99 ते 99.97 टक्के रोखण्याचा दावा करतात. बाजारात दिसणारे मास्क वेगवेगळ्या आकारात येतात. आपण चेहऱ्यावर फिट बसणाऱ्या मास्कची निवड करावी.

असे घालावे
प्रदूषणविरोधी मास्क घालण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा आणि मास्क स्वच्छ हाताने घाला म्हणजे त्याचा प्रभाव जास्त काळ टिकेल. हे मास्क घालताना आपले नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकतील याची खात्री करा. मुखवट्यामधील लवचिक पट्ट्या काळजीपूर्वक कानांच्या मागे गेल्या पाहिजेत. तसेच या मास्कचा धातूचा पट्टा नाकावर योग्य प्रकारे फिट असावा.

टाइट मास्क घालू नये
एकदा आपण मास्क घातल्यावर चांगला श्वास घ्या आणि तो सोडा म्हणजे हवा कुठूनही लिकेज होत नाही याची खात्री करा. मास्कच्या आत जी हवा येत आहे, ती मास्कमध्ये लागलेल्या व्हॉल्व्हमधून फिल्टर होऊन आलेली हवा असावी. जास्त टाइट मास्क घालू नका, नाही तर श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. डाेकेदुखी वाढू शकते, त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या.

बातम्या आणखी आहेत...