Murder / अकोल्यातील प्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची हत्या, मालकी वादातून हत्या झाल्याचा संशय

महापौरांच्या पती आणि मुलांनी हत्या केल्याची पोलिसांची माहिती

दिव्य मराठी वेब टीम

May 06,2019 04:24:00 PM IST

अकोला - येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांचा खून करण्यात आला. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील अशोक वाटिका चौकातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे.


या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. लाकडी फर्निचर आणि आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरने हुंडीवाले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने हुंडीवाले यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान किसनराव यांचे वकील नितीन धूत यांच्यावरही हल्ला झाला. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


महापौर आणि हुंडीवाले यांच्यात पूर्वीपासून होता वाद
शिक्षष संस्थेच्या मालकी वादातून किसनरावांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. किसनराव हुंडीवाले आणि अकोल्यातील भाजपा नेत्या आणि महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबात वाद होता. सुमन गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे. मुले रणजीत, प्रविण आणि विक्रम यांनी किसनराव हुंडीवाले यांची हत्या केल्याची माहिती पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी दिली. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.

X
COMMENT