Home | National | Other State | Property Buying Tips

घर असो वा जमीन, खरेदी करताना 'या' बाबींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा होईल नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:02 AM IST

घर घेताना ही काळजी घेतली, तर फसवणूक होणारच नाही

 • Property Buying Tips

  युटिलिटी डेस्क - कोणतीही व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्या मेहनतीची एक मोठी कमाई त्यात गुंतवत असते. त्यामुळे जी प्रॉपर्टी खरेदी केली जात आहे, तिची वैधता पूर्णपणे तपासणे अत्यंत गरजेचे होऊन जाते.

  > म.प्र. हायकोर्टातील अॅडव्होकेट संजय मेहरा सांगतात की, जर तुम्ही एखाद्या टाउनशिपमध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहात आणि तेथे सर्व बँका लोन देण्यासाठी तयार आहेत तर तेथे मोठी रिस्क नाही असे समजायला हरकत नाही. कारण बँका कोणत्याही टाउनशिपमध्ये तेव्हाच लोन देतात जेव्हा तेथील टाइटल (स्वामित्व) आणि सर्च क्लिअर असते. याउपरही व्यक्तीने आपल्या पातळीवर काही बाबींची पडताळणी करायलाच पाहिजे. आज आम्ही सांगत आहोत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही कोणकोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

  लिंक डॉक्यूमेंट्स चेक करा
  > तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर सर्वात आधी संबंधित कागदपत्रे तपासा. म्हणजे ती प्रॉपर्टी आतापर्यंत कितीवेळा खरेदी आणि विक्री झाली आहे ते पाहा.
  > हे तुम्हाला जुन्या रजिस्ट्रींवरून लक्षात येईल. ज्या कुणाकडून प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्याच्याकडून जुन्या रजिस्ट्रीची कॉपी घ्या.
  > मग हेही पाहा की सर्व रजिस्ट्रीमधील डिटेल एकमेकांशी जुळत आहेत अथवा नाही. जो तुम्हाला प्रॉपर्टी विकत आहे त्याचे आयडेंटिटी प्रूफ पाहा, ते कागदपत्रांसोबत मॅच करा. प्रॉपर्टी विकणाऱ्याकडून पॉवर ऑफ अॅटॉर्नीची कॉपी घ्या.

  भूमी रेकॉर्डची माहिती तपासा, पाहा पुढच्या स्लाइडवर...

 • Property Buying Tips

  भूमी रेकॉर्डची माहिती


  > तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात, त्याचे रेकॉर्ड धुंडाळा. शेतीची जमीन घेत आहात तर त्या डॉक्युमेंटसशी संबंधित सर्व माहिती राज्य सरकारच्या राजस्व विभागातून मिळू शकेल. जमिनीचा खसरा नंबर माहिती करून घ्या. यावरून तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व माहिती मिळून जाईल.


  > जर तुम्ही घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करत असाल, तर सर्वात आधी जेथे जमीन खरेदी करत असाल तेथे रेसिडेंशियल परमीशन आहे की नाही हे तपासा. जर प्रॉपर्टी कमर्शियल वा इंडस्ट्रियल आहे तर तेथे जमीन खरेदी करू नका, कारण तुम्हाला तेथे घर बांधता येणार नाही.

   

  टाऊनशिपमध्ये घेत असाल तर ही कागदपत्रे पाहा


  > एखाद्या टाऊनशिपमध्ये प्रॉपर्टी घेत असाल तर लँड युज चेक करा. पाहा की टाऊन अँड कंट्री प्लानिंगची परमिशन आहे अथवा नाही. लोक अथॉरिटी उदा. मनपाकडून नकाशाला मान्यता आहे अथवा नाही. सर्वात महत्त्वाचे हे आहे की, ज्या कॉलनीत तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल ती वैध आहे अथवा नाही.


  > अनेकांना वाटते की सरकारने रजिस्ट्री केली तर प्रॉपर्टी वैधच असेल, परंतु तज्ज्ञ सांगतात की, असे होत नाही.
  > रजिस्ट्री करताना सरकार फक्त महसुलाच्या अँगलने पडताळणी करते. एखादी प्रॉपर्टी वैध आहे नाही हे पडताळण्याची जबाबदारी ती प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या व्यक्तीची असते.
   
  वृत्तपत्रात जरूर माहिती द्या... पाहा पुढच्या स्लाइड्सवर

 • Property Buying Tips

  वृत्तपत्रात जरूर सूचना द्या...


  > प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी वृत्तपत्रात जरूर सूचना द्या. नेहमी लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जाहीर सूचना दिल्याने तुमची बाजू बळकट होते. अशा वेळी प्रॉपर्टीबद्दल भविष्यात कोणताही विवाद झाला तर तुम्ही कोर्टात मजबुतीने आपली बाजू मांडू शकता.


  > याप्रकारे अॅग्रीमेंटचे रजिस्ट्रेशन करणेही जरूरी आहे. आजकाल हे रजिस्ट्रीसोबतच केले जाते. अनेक जण अॅग्रीमेंट करत नाहीत. असे न केल्याने कायदेशीररीत्या तुमची बाजू कमजोर होते.

   

   

Trending