आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे चिमुरडा खेळत होता, तिकडे मामाने आईवर केले सपासप वार, धारदार तलवारीने एकुलत्या एक बहिणीला चिरले, रक्ताने माखलेली भिंत पाहून सगळेच घाबरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर- संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्याच माणसांचा खून करणे अतिशय वेदनादायी असते, परंतु अशा घटना सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना पुरहिरा परिसरात घडली आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता जमीन आणि वडिलोपार्जित घराच्या मालकी हक्कासाठी मोठा भाऊ रोशनलाल याने आपली एकुलती एक बहीण अमरजित (वय 45) हिचा तलवारीचे अनेक वार करून खून केला. घटनास्थळी सर्वत्र सांडलेले रक्त पाहून खून करणारा किती क्रूर असेल, याचा अंदाज येतो. हत्येनंतर जवळपास 3 तास आरोपीने पोलिसांना हुलकावणी दिली, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. हत्येसाठी वापरलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

 

असे आहे प्रकरण

पोलिस अधिकारी भरत मसिह म्हणाले की, गत दोन वर्षांपासून या भावा-बहिणीत जमिनीवरून वाद सुरू होता. आरोपीचा छोटा भाऊ कमलजितने सांगितल्यानुसार, रोशनलालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या आईचे म्हणणे आहे की, त्यांनी दोन्ही भावा-बहिणीची समजूत घातली होती. त्यांनी ऐकले असते तर आज हा काळा दिवस उजाडला नसता.

 

बहिणीला वाटायचे- जमीन आपल्या नावावर हवी

अमरजित कौरची हत्या करणारा भाऊ रोशन लाल 25 वर्षांपूर्वी सख्ख्या मामीला घेऊन पळून गेला होता. तो जालंधरच्या फॅक्टरीत काम करत होता. 2015 मध्ये मामीचा मृत्यू झाल्यावर वर्षभराने तो परत पुरहिरा येथील घरी राहण्यासाठी आला होता. परतल्यावर त्याने घराशेजारीच नवीन घर बांधले. यानंतर अमरजित कौर जमीन आणि वडिलोपार्जितील घर आपल्या नावावर करण्याची मागणी करू लागली, तेव्हा या भावा-बहिणीमध्ये नेहमी भांडण होऊ लागली.

 

रक्ताने माखलेली भिंती पाहून मृत बहिणीच्या मुलाने विचारले... काय झाले? 

चिमुरड्याने विचारल्यावर घरच्यांनी सांगितले की, तुझ्या आईला दुखापत झाली आहे. हे ऐकल्यावर ते निरागस मूल परत खेळण्यात गुंग झाले. मृत महिलेचा 10 वर्षांचा मुलगा बुनिश कुमार सहावीत शिकत असून शुक्रवारी तो घरी आला तेव्हा रक्त पाहून तो म्हणाला की, हे काय झाले आहे? यावर त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तुझ्या आईला दुखापत झाली आहे, तिला दवाखान्यात घेऊन जात आहोत. हे ऐकून तो आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी परत बाहेर निघून गेला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...