spa center / पुण्यात स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय; पाच परदेशी तरुणींची सुटका

मसाज सेंटर व्यवस्थापकाला अटक 

दिव्य मराठी

Aug 20,2019 08:11:00 AM IST

पुणे - खडकवासला धरणाजवळील नांदेड सिटीजवळ एका माॅलमधील स्पा सेंटरवर पाेलिसांनी छापा टाकून थायलंडच्या ५ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार कादर शेख याचा पाेलिस शाेध घेत आहेत. आर्चिड फाइड स्पा मसाज सेंटरमध्ये हायप्राेफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकून तरुणींची सुटका केली.

X