इतकी हलाखीची परिस्थिती / इतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2018 12:01:00 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे.


2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले. त्यांना सामान्य नागरिकांसारखीच वागणूक, प्रॉपर्टीमध्ये भागिदारी आणि मतदानाचा अधिकार देखील मिळाला. यापूर्वी 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना तिसरे लिंग (तृतीयपंथी) अशी अधिकृत ओळख दिली. तरीही त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि भेदभाव अद्याप थांबलेले नाहीत. समाजात आजही सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे, ट्रान्सजेंडर भीक मागून किंवा वेश्यालयात देहविक्रय करून आपले पोट भरत आहेत.


तृतीयपंथीयांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या सक्रीय
पाकिस्तानचे आदिवासी आणि ग्रामीण भागात तृतीयपंथीयांवर अत्याचार केले जातात. खास ट्रान्सजेंडरला लक्ष्य करून बलात्कार आणि हत्या करणाऱ्या टोळ्या देखील सक्रीय आहेत. ऑनलाइन संस्था नेटवर्क ट्रान्स अॅक्शन खैबर पख्तूनख्वाने सोशल मीडियावर या विरोधात एक मोहिम छेडली. त्यामध्ये या प्रांतातील ट्रान्सजेंडर विरोधी टोळ्यांचा उल्लेख केला जातो. गेल्या 2 वर्षांत या टोळ्यांनी 45 तृतीय पंथियांची हत्या केली. तसेच कित्येक ट्रान्सजेंडरवर बलात्कार झाले. पोलिसांमध्ये सुद्धा त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत.

फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे.लग्न समारंभांमध्ये नाचून काही लोक आपले पोट भरतात. परंतु, रोज असे काम मिळत नसल्याने जगण्याचा प्रश्न उद्भवतो.

फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे.

लग्न समारंभांमध्ये नाचून काही लोक आपले पोट भरतात. परंतु, रोज असे काम मिळत नसल्याने जगण्याचा प्रश्न उद्भवतो.
X
COMMENT