आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा वहिनीशी प्रेमसंबंधास विरोध; मुलाकडून बापाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- विधवा वहिनीशी असलेल्या प्रेसंबंधास विरोध करणाऱ्या जन्मदात्या बापाचा मुलाने दारूच्या नशेत बेदम मारहाण करून खून केल्याची घटना कळवण तालुक्यातील हिंगवे येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व संताप व्यक्त होत आहे. अभोणा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.   


अभोणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगवे या आदिवासी पाड्यात  ही दुर्दैवी घटना घडली. येथील रामदास भिका गांगुर्डे (६२) यांचा मोठा मुलगा शांताराम गांगुर्डे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर लहान भाऊ राजेंद्र गांगुर्डे (३०) याचे विधवा वहिनीशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्याने वहिनीला घरी ठेवून घेतले होते. या प्रकाराला त्याचे वडील शांताराम गांगुर्डे यांचा विरोध होता. गुरुवारीदेखील त्यांच्यात याच मुद्द्यावर वाद सुरू होता. या वेळी दारूच्या नशेत असलेल्या राजेंद्रने बापाला बेदम मारहाण केली. त्यात रामदास गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावातील काही जणांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...