Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | protest against mla murkute in newasa

नेवाशात मोटारसायकल अडवून मुरकुटेंच्या राजीनाम्याची मागणी; आंदोलकांची घोषणाबाजी

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 12:27 PM IST

नेवासे येथे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना अडवून आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.

  • protest against mla murkute in newasa
    नेवासे - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या नेवासे येथील आरक्षण मोर्चाला गैरहजर राहिल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची मोटारसायकल अडवून आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.

    शहरात शुक्रवारी झालेल्या मराठा, धनगर व मुस्लीम समाजाच्या मोर्चाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व धर्मिय बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र आमदार मुरकुटे हे या मोर्चास उपस्थित नसल्याने त्याचा मोर्चात निषेध केला होता. शनिवारी सायंकाळी आमदार मुरकुटे हे आपली गाडी संपर्क कार्यालयासमोर लावून कार्यकर्त्यांसमवेत शहरात भेटीगाठी गेले होते. येथून परत येत असताना खोलेश्वर गणपती मंदिर चौकात भाऊसाहेब वाघ, जितू महाले यांनी घोषणा देत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमदार मुरकुटे हे गाडी थांबवून खाली उतरले असता वाघ यांनी जोरदार घोषणाबाजी केली व राजीनाम्याची मागणी करत मोर्चाला हजर नसल्याने मुरकुटे यांना जाब विचारला. आमदार मुरकुटे प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. दरम्यान, गणपती मंदिर चौकात मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी त्वरित दखल घेऊन जमाव पांगवला.

    भाजप शासनच मराठा आरक्षण देणार
    भाजप शासनच कायमस्वरूपी मराठा आरक्षण देणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आम्ही शिल्पकार ठरत असताना अशा वेळी आम्ही राजीनामा देऊ शकत नाही. आंदोलकांना सामोरे जाऊन आम्ही त्यांना समजावून सांगणार आहोत व आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार मुरकुटे यांनी सांगितले.

Trending