आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाला जमिनी देण्यास नगरमध्ये विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अहमदनगर- नागपूर समृद्धी महामार्गासाठी नगर जिल्ह्यातील काही भागात भूसंपादन केल्यानंतर आता सुरत ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्गही नगर जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गााला जमिनी देण्यास नगर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी (७ डिसेंबर) भेट घेणार असल्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. 


केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नगर जिल्हा हद्दीत सुमारे १०० किमी लांबीचे काम केले जाणार आहे. जिल्ह्यात या महामार्गाचे संगमनेर तालुक्यातील काही गावांत सर्वेक्षण झाले आहे. या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची बागायती जमीन यामध्ये जाणार आहे. काही शेतकरी, तर भूमिहीन होणार असल्याचे चित्र असून त्यामुळे या महामार्गाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.

 
नगर तालुक्यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या कामास विरोध सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोडीत काढण्याचे धोरण अवलंबले आहे काय? असा सवाल जालिंदर कदम यांनी केला. या सरकारने सध्या अस्तित्वात असलेले महामार्ग विकसित करण्याऐवजी नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू केले आहे.

 

गुजरातच्या विकासासाठी होऊ घातलेल्या या महामार्गाला शेतकरी विरोध करतील, असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. सुरेश बोरा, प्रा.देवराम शिंदे, शशिकांत गायकवाड, भीमराज आढाव, एकनाथ गुंड, अमोल लहारे, रोहिदास झिने, विलास ठाणगे, अप्पा झिने, गोरक्षनाथ झिने, राम लहारे, सुनील झिने, नितीन झिने, कचरू सोनार, अनिल कदम, कैलास कदम उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...