Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Protest for maratha reservation in pandharpur

​पंढरपुरात मराठा अारक्षणासाठी एक किलोमीटर मानवी साखळी

दिव्य मराठी | Update - Aug 06, 2018, 06:50 AM IST

मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलनाला चौथ्या दिवशी रविवारी प्रतिसाद मिळाला.

  • Protest for maratha reservation in pandharpur

    पंढरपूर- मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलनाला चौथ्या दिवशी रविवारी प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत एक किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली. रोपळे जिल्हा परिषद गटातील गावांतील युवक आणि नागरिक घोषणाबाजी करत आले.

    तहसीलसमोर उभारलेला मंडप अपुरा पडू लागल्याने आदोलनकर्ते उघड्यावर बसले आहेत. रोपळे, तुंगत, देगाव, अजनसोंड, नारायण चिंंचोली, आढीव, बाभुळगाव गावांतील दीड हजारांवर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनात उपस्थिती दर्शवली. 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी परिसर दणाणला. होते.

Trending