आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादेत डॉक्टर तरुणीचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी लातूरमध्ये निषेध मोर्चा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
डॉक्टर तरुणीच्या बलात्कार, खूनप्रकरणी लातूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. - Divya Marathi
डॉक्टर तरुणीच्या बलात्कार, खूनप्रकरणी लातूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला.

लातूर  - हैदराबाद येथे डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी लातूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी प्रियंका रेड्डी या डॉक्टर तरुणीवर हैदराबादमध्ये चार तरुणांनी बलात्कार केला आणि तिला जिवंत जाळल्याची अमानुष घटना घडली होती. लातूरमध्ये या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. दोन दिवसांपूर्वीच कँडल मार्च काढण्यात आला होता. मंगळवारी शालेय विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निषेध मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

त्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी
 

परभणी - डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून निर्घृणरीत्या खून करणाऱ्या नराधमांना अतिशीघ्ररीत्या मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी(दि.तीन) निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांच्यासह महिला पदाधिकारी व युवतींनी निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...