आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Proud Moment : Oscar Academy Invites Jaheya Akhtar, Anurag Kashyap And Anupam Kher To Become Members This Year

प्राउड मोमेंट : ऑस्कर अकॅडमीने दिले आमंत्रण, जाेया अख्तर, अनुराग कश्यप आणि अनुपम खेर बनणार यावर्षी सदस्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस अकॅडमीने सोमवारी प्रतिष्ठित संगठनेमध्ये सामील होण्यासाठी 59 देशांच्या 842 कलाकारांना नव्या सदस्यांच्या रूपात आमंत्रित केले आहे. या कलाकारांच्या लिस्टमध्ये बॉलिवूडमधून अनुपम खेर, जोया अख्तर आणि अनुराग कश्यपसह एकूण 6 लोकांची नावे आहेत.  

 

लिस्टमध्ये आहे त्यांच्या कामाचाही उल्लेख... 
अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या लिस्टमध्ये तिघांच्या कामाचाही उल्लेख आहे. अनुपम खेर यांना हॉटेल मुंबईमुळे ऑस्कर अकॅडमी मध्ये सामील केले गेले आहे. जोया अख्तरला 'गली बॉय' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यांसारख्या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे निवडले गेले आहे. तसेच शॉर्ट फिल्म्स आणि फीचर अॅनिमेशन कॅटॅगरीमध्ये 'मेडली' आणि 'बॉम्बे टॉकीज' बनवणाऱ्या अनुराग कश्यप यांचेही नाव सामील आहे. 

 

यांचीही नावे आहेत सामील... 
तीन मोठ्या कलाकारांव्यतिरिक्त रायटर रितेश बत्रा, 'हिचकी' आणि 'सुई धागा' मध्ये व्हिजुअल इफेक्ट्स बनवणारे शैरी भरदा आणि '2.0', 'बाहुबली' शी निगडित असलेले श्रीनिवास मोहन यांनाही ऑस्कर अकॅडमीसाठी निवडले गेले आहे. 

 

 

अकॅडमीमध्ये आमंत्रितांबद्दल माहिती... 
आमंत्रित केलेल्या लोकांमध्ये यावर्षीचे सर्व 21 ऑस्कर विजेते, 82 ऑस्कर नॉमिनीज आणि 85 नॉमिनेशन झालेल्या लोकांची नवे सामील आहेत. ज्यांची घोषणा 10 शाखांच्या आधारावर झाली आहे. यावेळी 59 देशांतील 842 नव्या सदस्यांच्या नावांची घोषणा आमंत्रित सदस्य म्हणून झाली आहे. महिलांसाठीही 2019 मध्ये 50 टक्के सदस्यतेबद्दल बोलणे झाले झाले. 

 

याआधीही जोडले गेले आहे भारताचे नाव... 
यापूर्वी शाहरुख खान, आदित्य चोप्रा, प्रियांका चोप्रा, तब्बू आणि अनिल कपूर यांसारख्या भारतीय कलाकारांना ऑस्कर अकॅडमीचा भाग बांणण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...