आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेक्टरी 25 नव्हे 50 हजार मदत द्या , जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सदस्यांनी मांडला ठराव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्याच्या मेहनतीचा घास निसर्गाने हिसकवला आहे. हे नसे थोडके की शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी जे पंचनामे केले जात आहे. त्यात शेतकऱ्यांना सेतूवर रांगा लावाव्या लागत असून, कागदपत्रांसाठी अडीचशे ते तीनेश रुपये खर्च लागतं आहे. जो आधीच खचला आहे, त्याला खचवण्याचे काम अधिकारी करत आहेत. तेंव्हा शेतीचे पंचनामे वैयक्तिक न करता सामुहिक करुन सरसगट सर्वांना शासकीय मदत मिळवून द्यावी असा सर्वानुमते ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सदस्यांनी सोमवारी मांडला. त्यास सर्वांनी मंजूर करत हा ठराव शासनाला मंगळवारी पाठवण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या शिथिलतेनंतर सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा घेण्यात आली. गेल्या महिनाभरात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या शेतमाल, जनावरांचा चारा, आरोग्य विषयांवरच सोमवारची सभा गाजली. यात प्रामुख्याने विमा कंपन्यांकडे शेतकऱ्याची माहिती असतांना पुन्हा शासकीय मदतीसाठी सेतू सुविधा केंद्रात शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.


असा प्रश्न सदस्य जितेंद्र जयस्वाल, किशोर बलांडे, अविनाश गलांडे यांनी उपस्थित केला.यावर शेतकऱ्यांना मदतीपूर्वी केले जात असलेल्या पंचनाम्यावर आक्षेप घेण्यात आला. हे पंचनामे कमी आणि शेतकऱ्यांची पिळवणूक जास्त असल्याचे जयस्वाल म्हणाले.वैयक्तिक पंचनामे होत राहिले तर शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल. तेंंव्हा सामुहिक पंचनामे करुन त्वरीत मदतकार्य पोचण्याचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. यावर अध्यक्ष अॅड. डोणगावकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मंगळवारी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. असे सांगितले.


मधुकर वालतुरे यांनी पावसामुळे शेत मालासह,  जनावराचेही हाल होत आहेत. जनावरांचे खाद्य नाही, चारा भिजला आहे. पाण्यामुळे आता रोगराई पसरण्याची भिती असून, जनावरांमध्ये होणाऱ्या आजारांसंबंधी पशुसंवर्धन विभाग काय करतो आहे. असा प्रश्न उपस्थित करत मेंढ्या, गायी, म्हशी मृत्यूमुखी पडत असल्याने फिरता दवाखाना सुरु करण्यात यावा. अशी मागणी केली.यावर  केशवराव तायडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती देवून चारा भिजल्याने पशुखाद्य देण्यात येईल. शेतकऱ्यांनाही धान्य नाही. तेंव्हा त्यांना मोफत काही दिवस पुरेल एवढे राशन देण्याचाही ठराव मांडण्यात आला. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, 6 लाख 76 हजार लहान मोठी जनावरे जिल्ह्यात आहेत. 4  लाख शेळ्या मेंढया आहेत. त्यासाठी 12 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीची तरतुद करावी लागेल.यासाठी शासनाला कळवले आहे. यावेळी निवडूण आलेल्या आमदारांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला. या सभेस समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, बांधकाम सभापती विलास भुमरे, जि.प. सदस्य मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, पंकज ठोंबरे, किशोर बलांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...