आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायी सरकारसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये सर्वच मुद्द्यावर एकमत; लवकरच भूमिका स्पष्ट करू- पृथ्वीराज चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातील सत्ता पेचावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सकारात्म चर्चा होत आहेत. यातच आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व बाजूने सकारात्म चर्चा झाली आहे. पर्याची सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यात एकवाक्यता झाली आहे. उद्या मुंबईत परत एकदा चर्चा होणार आहे. उद्याच्या चर्चेत आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा होईल आणि त्यात सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्यावर पुढील भूमिका लवकरच स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह ही नावे चर्चेत

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मनोमिलनानंतर एक फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि संपूर्ण 5 वर्षे काँग्रेसचा उपमुख्यमंत्री करणार असे सांगितले जात आहे. सीएम पदासाठी शिवसेनेकडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नावे पुढे आहेत. तर राष्ट्रवादीकडून सीएम पदासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव समोर येत आहे. तर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत आहे.

महाराष्ट्रात 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यात एकत्रित निवडणूक लढवलेल्या शिवसेना आणि भाजपच्या महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळाले. परंतु, मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर दोघांनी युती तोडली. याच दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजप आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावले. परंतु, कुणीही सत्ता स्थापित करू शकले नाही. त्यामुळे, राज्यातील एकूणच परिस्थिती लक्षात घेता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यावर 12 नोव्हेंबर रोजीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. राष्ट्रपती राजवटीनंतरही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरूच आहेत. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन सत्ता स्थापित करण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...