आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांनी’ सीबीआयची रया घालवली पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - सीबीआय ही देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. या संस्थेची प्रतिष्ठा टिकली तरच देशातील लोकांचा सरकारवर विश्वास राहील. मात्र सीबीआयच्या प्रमुखांचा रात्रीतून पदभार काढून घेणे, तेथे पात्रता नसलेल्या अधिकाऱ्याला बसवणे, फायलींसाठी धाडी टाकायला लावणे हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. या प्रकारांमुळे सीबीआयची रया गेली असून याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण 
यांनी केली.  


लातूर येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी ते आले असता त्यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला. चव्हाण म्हणाले की,  देशातील नागरिकांमध्ये लोकशाही मूल्य रुजवायची असतील तर तपास संस्थांना स्वातंत्र्य द्यावेच लागते. दुर्दैवाने मोदी सरकारच्या काळात या बाबी घडत नाहीत. रफाल प्रकरणात तक्रार आल्यानंतर अलोक वर्मा यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ती दाखल होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांत भांडणे लावण्यात आली. ही लढाई आता रस्त्यावरच्या भांडणांसारखी होऊ लागली आहे. त्यातच सीबीआय प्रमुखांचा पदभार काढून घेणे, रात्री त्यांच्या कार्यालयावर धाडी टाकणे, तुलनेने कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सीबीआय प्रमुखपदाची जबाबदारी देणे हे प्रकार देशहिताचे नाहीत.

 

रेल्वेने पाणी दिल्यामुळे बदनामी 
लातूरला दोन वर्षांपूर्वी पाणीटंचाई निर्माण झाली होती. खरेतर पिण्याएवढे पाणी लातूरमध्ये उपलब्ध होते. परंतु भाजप सरकारने लातूरला रेल्वेने पाणी पुरवले. रेल्वेने आलेल्या पाण्याचे मोजमाप केले तर याद्वारे अत्यल्प पाणी मिळाले. परंतु त्याचा गवगवा जास्त झाला. त्यामुळे केवळ लातूरच नव्हे तर मराठवाड्याची बदनामी झाली. या भागावर दुष्काळी, तहानलेला परिसर असा शिक्का बसला. त्यामुळे उद्या एखादा उद्योग, प्रकल्प या भागात येताना हजारदा विचार करेल. रेल्वेने पाणी पुरवल्याच्या घटनेचे नकारात्मक परिणाम बाजारपेठेवर झाले. त्यामुळे उद्योग आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार घटल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...