आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वी शॉवर 8 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई, डोपिंग चाचणीमध्ये आढळला दोषी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे बीसीसीआयने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता पुढील आठ महिने पृथ्वी शॉला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. आधीच दुखापतीने त्रस्त असलेल्या पृथ्वीवर मोठे संकट कोसळले आहे. 


प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याने कफ सिरफ घेतले होते. त्यामध्ये आढळणारा प्रतिबंधित घटकामुळे तो अँटी-डोपिंग चाचणीत दोषी आढळला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. Terbutaline नावाच्या औषधाचे सेवन केल्याचे या चाचणीत निष्पन्न झाले. हा पदार्थ "वाडा" (World Anti-Doping Agency)ने बंदी घातलेल्या यादीमध्ये आहे.


डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वीने 16 जुलै रोजी स्पष्टीकरण दिले होते. कफ सिरफसाठी हा घटक घेतल्याचे त्याने सांगितले आणि बीसीसीआयने हे स्पष्टीकरण मान्य केले आहे. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या काळात पृथ्वी शॉवर ही बंदी लागू असेल. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय संघात पृथ्वी शॉचा समावेश नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण तो दुखापतीमुळे बाहेर असल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...