आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आजार शरीराच्या कोणत्याही भागामध्ये होऊ शकतो, बचावासाठी आयुर्वेदिक उपाय फायदेशीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी तुरळक सापडणाारा सोरायसिस हल्ली सहजपणे अाढळणारा त्वचाविकार झालाय. जागतिक सोरायसिस फेड्रेशननुसार 100 पैकी 2 ते 3 व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. सोरायसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ खाज किंवा खवले पडणे असा होतो. हा एक किचकट त्वचाविकार असून, यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठलाही खात्रीशीर उपाय अद्याप नाही. आयुर्वेदानुसार या आजाराला एककुष्ठ असे म्हटले जाते. काही आयुर्वेदतज्ज्ञ याला किटिभ कुष्ठ देखील म्हणतात. 


आधुनिक शास्त्रानुसार या आजारात आपली व्याधी प्रतिकारशक्ती ही विकृत होते व ती स्वत:च्या त्वचेच्या वरच्या स्तराला शरीराबाहेरील घटक म्हणून ओळखते व त्या त्वचेविरुद्ध काम करून तो स्तर शरीरापासून विलग करते व यामुळे त्वचेच्या बाहेरील स्तराची निर्मिती प्रक्रिया देखील जलद सुरू होते व त्वचा लालसर व चांदेरी रंगाच्या चट्ट्यांनी व खवल्यांनी भरून जाते. हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. येथे जाणून घ्या, या आजारामध्ये कोणते चार पदार्थ फायदेशीर ठरतात...


दही 
दह्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. यामुळे स्कल्पवर कोरडा पापुद्रा राहत नाही. दही हलक्या हाताने त्वचेवर लावावे. ते सुमारे २० मिनिटांपर्यंत लावलेले राहू द्या. त्याची हलक्या हाताने मसाज केल्यानंतर अँंटिसेप्टिक शॅम्पूने धुवून घ्या. जास्त कोरडेपणा असेल तर यात खोबरेल तेल टाकून लावल्यानेही फायदा मिळतो. 


आले 
आल्यामध्ये अँटिमायक्रोबियल आणि अँटिसेप्टिवल गुणधर्म आढळतात. त्यामुळे संसर्गापासून बचाव होतो. यासाठी आल्याच्या एक तुकडा पाण्यामध्ये उकळून ते पाणी चाळून घ्या. आता या पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करा. रॅशेज, पिंपल्स, खाज इत्यादी त्वचा विकार बरे होण्यास या उपायामुळे मदत मिळते. 

बातम्या आणखी आहेत...