Home | Khabrein Jara Hat Ke | pubg addiction lands fitness trainer in hospital self harming after being obsessed

PUBG मुळे व्यक्तीचे बिघडले मानसिक संतुलन, स्वतःलाच करतो मारहाण; डॉक्टरही झाले हैराण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:13 AM IST

याआधी 5 जण झाले होते PUBGचे शिकार, देशात आणि राज्यात गेमवर बंदी आणण्याची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची मागणी

 • pubg addiction lands fitness trainer in hospital self harming after being obsessed


  जम्मू-काश्मीर - PUBG ची क्रेझ भारतासह संपूर्ण जगावर पसरली आहे. या गेमला भारतामध्ये आतापर्यत 5 कोटींहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. युवकांमध्ये या गेमची चांगलीच चर्चा आहे. नवनवीन अपडेट्स सोबत गेममधील होणारे नवनवीन बदल लोकांना गेम खेळण्यास उत्साहित करत आहेत. पण यासोबत हो गेम लोकांना आजारी देखील करत आहे. याचे व्यसन हाणीकारक असल्याचे सिद्ध होत आहे. पब्जी खेळण्यामुळे जम्मू-काश्मीर मध्ये चक्क एका फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो स्वतःच्याच कानशिलात लावून घेत आहे.

  चक्क फिटनेस ट्रेनरचे बिघडले मानसिक संतुलन

  मीडिया रिपोर्टनुसार सलग 10 दिवस गेम खेळत असताना त्याला इतकी याची सवय झाली आहे की, त्याने स्वतःलाच मारहाण करत जखमी केले आहे. यानंतर त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरही हैराण झाले आहेत. पबजीमुळे फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, रूग्ण मानसिक स्थिती सध्या गंभीर आहे. त्याने अर्धवटपणे आपले मानसिक संतुलन सोडले आहे. त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तो काही दिवसांत ठीक होण्याची आशा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  गेमवर बंदी आणण्याची मागणी

  पबजी जगातील सर्वाधीक विक्री होणारा पाचवा गेम आहे. पबजीमुळे आजारी होणारा फिटनेस ट्रेनर हे सहावे प्रकरण आहे. याअगोदर डॉक्टरांनी 5 लोकांवर उपचार केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक लोक या गेमचे शिकार होत आहेत. अशातच राज्य आणि देशात या गेमवर बंदी आणण्याची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागणी केली आहे.

  याअगोदर एक 15 वर्षीय मुलगा पबजी गेमचा शिकार झाला होता. बंगळुरु येथील रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या गेमची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यत 5 कोटीपेक्षा जास्तवेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे. जूनमध्ये तिसरा सर्वात चर्चित गेम होता. कॉम्प्युटर, अँड्रॉईड आणि आयओएस वर हा गेम उपलब्ध आहे.

  अशाप्रकारे खेळतात हा गेम
  यामध्ये पॅराशूटच्या मदतीने 100 प्लेयर्सना एका आयलँडवर उतरवले जाते. येथे या प्लेयर्सना बंदुकांचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर शत्रुंना मारावे लागते. सगळ्यात शेवटी जो वाचतो तो या गेमचा विजेता असतो. या गेमला 4 जणांचा एक ग्रुप तयार करून देखील खेळता येते. जो ग्रुप शेवटपर्यंत पोहोचतो त्या सर्वांनी विजेता म्हणून घोषित करण्यात येते. या गेमला डाउनलोड करण्यासाठी फोनमध्ये 2 जीबीची स्पेस असणे आवश्यक आहे. कारण हा गेम फोनमधील तेवढी जागा व्यापतो.

Trending